घरताज्या घडामोडीमथुरेत मंदिर-मस्जिद बाजूला असू शकतात तर अयोध्येत का नाही?, असदुद्दीन ओवैसी उत्तरात...

मथुरेत मंदिर-मस्जिद बाजूला असू शकतात तर अयोध्येत का नाही?, असदुद्दीन ओवैसी उत्तरात म्हणाले…

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एआईएमआईएमकडूनही उमेदवार देण्यात येणार आहे. एआईएमआईएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी भाजप आणि समाजवादी पार्टीवर निशाणा साधत आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यावर ओवैसी यांनी सीएए-एनआरसी या मुद्द्यावरुन भाजपला निशाणा केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी असदुद्दीन ओवैसी समाजवादी पार्टीचे एजंट असल्याचे म्हटलं होते. तसेच ओवैसी उत्तर प्रदेशमधील वातावरण बिघडवत असल्याचा आरोप योगींनी केला होता. या आरोपांदरम्यान आता ओवैसींचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ओवैसी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान प्रश्न विचारण्यात आला की, जर मथुरामध्ये मंदिर आणि मस्जिद बाजूला असू शकतात तर अयोध्यामध्ये का असू शकत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर ओवैसी देणार त्यापुर्वी सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, मी हे स्पष्ट करु इच्छितो की, भविष्यात मथुरेतही मंदिर-मस्जिद बाजूला राहणार नाही.

- Advertisement -

असदुद्दीन ओवैसींनी दिले खोचक उत्तर

ओवैसी म्हणाले की, तुम्ही अयोध्येची केस जरी जिंकले तरी ते ढाचे पाडण्यात आले त्यामध्ये एकावरही कारवाई कऱण्यात आली नाही. असा न्याय असतो का? असे करणाऱ्यांच्याविरोधात कारवाई केली पाहिजे होती. यानंतर सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, आम्ही न्यायालयात आहे. न्यायलयात दोघांची बाजू ऐकूण निर्णय घेतला जातो. आम्हाला वाटत आहे की, तुम्हीही तुमची बाजू तिथे मांडा अन्यथा आम्ही संसदेच्या मार्गाने ते पण पुर्ण करु. शाहाबानो केसमध्येही असेच झाले होते तेव्हा सर्वोच्च न्यालयाने आपला निर्णय बदला होता.

योगी आदित्यनाथ यांचा मुस्लिम टोपी घालण्यास नकार

योगी आदित्यनाथ यांनी मुस्लिम टोपी घालण्यास नकार दिला असा प्रश्न ओवैसींना विचारले असता ते म्हणाले की, जर मी तिथे असतो तर त्यांना टोपी घालण्यसाठी दिली नसती. कारण एवढ्या वर्षांपासून ते मुस्लिमांना टोपी घालण्याचे काम करत आहेत. मी तिथे असतो तर त्यांना सांगितले असते तुम्ही मुस्लिम समुदायावर होणारा अन्याय रोखा आणि ज्यांना न्याय दिला नाही त्यांना न्याय द्या. टोपी घालण्यामुळे काही साध्य होणार नाही. एका मुख्यमंत्र्यांचे काम असते की त्यांनी राज्याच्या जनतेला सुरक्षित ठेवावे.

- Advertisement -

हेही वाचा : ममता बॅनर्जी आणि शरद पवारांना काँग्रेसला बाजूला ठेवायचं आहे – देवेंद्र फडणवीस


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -