Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Asaduddin Owaisi : शरद पवारांनी संजय राऊतांसाठी मोदींची भेट घेतली मग मलिकांसाठी...

Asaduddin Owaisi : शरद पवारांनी संजय राऊतांसाठी मोदींची भेट घेतली मग मलिकांसाठी का नाही? ओवैसींचा सवाल

Subscribe

2020 मध्ये अनेक गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेला AIMIM भिवंडीचा नेता खालिद गुड्डू याच्या सुटकेची मागणीही ओवैसी यांनी केली.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी (Asaduddin owaisi aimim) काल भिवंडीतील सभेत पंतप्रधान मोदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासाठी शरद पवारांनी मोदींची भेट घेतली मग नवाब मलिकांसाठी ही भेट का घेतली नाही असा थेट सवाल ओवैसींनी उपस्थित केला आहे. दरम्यान मुघलांवरून मुस्लिमांना केले जाणार टार्गेट आणि ज्ञानवापी मशीद, (Gyanvapi) ताजमहल मुद्यांवरूनही ओवैसींनी हल्लाबोल केला आहे. दरम्यान मुस्लीमांची ओळख पुसण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. महागाईच्या मुद्द्यावरूनही त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. (asaduddin owaisi on modi government)

 “शरद पवारांनी मलिकांसाठी मोदींची भेट का घेतली नाही?” 

शिवसेना खासदार संजय राऊत owaisi latest sanjay raut) यांच्यावर कारवाई करु नका, त्यांना जेलमध्ये टाकू नका असे म्हणता, मात्र दुसरीकडे नवाब मलिकांना जेल का जाऊ दिले? त्यांना जेलबाहेर का काढले नाही? असा सवाल ओवैसींनी उपस्थित करत शरद पवारांवर निशाणा साधला, तसेच संजय राऊत आणि नवाब मलिक बरोबरीचे नेत नाही का? असाही प्रश्न उपस्थित करत संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी नवाब मलिकांपेक्षा जास्त जवळचे झालेत असा आरोप त्यांनी केला. याशिवाय हा शरद पवारांचा (sharad pawar) खरा चेहरा आहे. मी सत्य समोर ठेवण्याचे काम करतो,” असंही ओवैसी म्हणाले.

- Advertisement -

ओवैसी पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि भाजपला रोखण्यासाठी एआयएमआयएमला मत देऊ नये असे सांगितले. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने प्रतिस्पर्धी शिवसेनेसोबत युती केली.”

भाजप सरकारवर हल्लाबोल

- Advertisement -

यावेळी ओवेसींनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, “आज देशात बेरोजगारी, महागाई यावर कोणी बोलत नाही. आज मुस्लिमांना भाजपचा धाक दाखवला जात आहे. भाजप-संघ देशात खोटी माहिती पसरवत आहेत. भारताची खरी तारीख मुघलांपासून सुरू झाली का? औरंगजेबाने भारतात बेरोजगारी वाढवली का? मुस्लिम मारले जातात, याला जबाबदार कोण? काश्मीरमध्ये सरकारी कर्मचाऱ्याच्या हत्येला जबाबदार कोण?” असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

आमच्या पंतप्रधानांच्या सत्तेला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. मी त्यांना विचारतो की, त्यांनी देशात महागाई कशी वाढू दिली? देशाचे पंतप्रधान म्हणतात की, मी 8 वर्षात सर्वात जास्त काम केले आहे. भाजपवर हल्लाबोल करताना ओवैसी म्हणाले की, गायीच्या नावावर, टोपीच्या नावावर, दाढीच्या नावावर मारल्या जाणाऱ्यांना जबाबदार कोण? उत्तरात भाजपने मोदींना विचारले असता, 370 काढून टाकल्याचे ते सांगतात. भाजपने दहशतवादाचा नायनाट करणार असल्याचे सांगितले होते. त्याचे पुढे काय झालं? शेजारी देशातून येऊन काश्मीरमध्ये हिंसाचार कसा होत आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

भारत हा द्रविड आणि आदिवासींचा”

ओवैसींनी भाजप संघावर हल्लाबोल करत म्हटले की, “हा भारत कोणाचा आहे, हा भारत माझाही नाही, हा भारत उद्धव ठाकरेंचा नाही, ओवैसीचा नाही, मोदींचा नाही, शाहांचाही नाही. भारत कोणाचा असेल तर तो द्रविड आणि आदिवासींचा आहे. चार ठिकाणाहून लोक इथे आले, पण भाजप-आरएसएस म्हणते की मुघल आले- मुघल आले…लोक आफ्रिकेतूनही आले, तेही इराणमधून आले, मध्य आशियातूनही आले, पूर्व आशियातून तेव्हा हे सगळे आले, तेव्हा भारताची निर्मिती झाली, पण आदिवासी इथलेच आहेत, द्रविड इथले आहेत. आर्य इथे 4000 वर्षांपूर्वी आले होते.”

भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, सपावर हल्लाबोल

ओवेसी म्हणाले पुढे म्हणाले की, “भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, सपा हे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत. त्यांना असे वाटते ते तुरुंगात जाऊ नये, पण मुस्लिम पक्षाचा सदस्य गेला तर ठीक आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना भेटून संजय राऊत यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे आवाहन केले. मला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारायचे आहे की पवारांनी नवाब मलिकसाठी असे का केले नाही?” असा सवाल त्यांनी विचारला.

मुस्लिमांच्या श्रद्धेविरुद्ध बोलले तर कायदेशीर कारवाई का नाही?  

ओवैसींनी मुस्लीमविरोधी कारवायांवर भाष्य करत म्हटले की, “त्यांना दाढी, टोपी समस्या, मशिदीची अडचण आहे. अजानचा त्रास होऊ लागला आहे. बाबरी मशिदीचा निर्णय देशात आला तेव्हा मी कुठे होतो, आता यानंतर ज्ञानवापी, मथुरा आणि इतर सर्व ठिकाणांची नावे घेतली गेली आणि आज ते सर्व खरे होत आहे. मोदी, उद्धव ठाकरे, शरद पवार, योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात कोणी काही बोलले तर त्यांच्या घरावर हल्ला होतो. बोलणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते. मग कोणी आमच्या विरोधात आमच्या श्रद्धेविरुद्ध बोलले तर कायदेशीर कारवाई का होत नाही,” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

खालिद गुड्डूच्या सुटकेची मागणी

2020 मध्ये अनेक गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेला AIMIM भिवंडीचा नेता खालिद गुड्डू याच्या सुटकेची मागणीही ओवैसी यांनी केली. गुड्डूला निरपराध असल्याचे सांगून एआयएमआयएम प्रमुखांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याची सुटका करण्याची विनंती केली. यावर ते म्हणाले की, मी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना खालिद गुड्डूची सुटका करण्याची विनंती करतो. निसर्ग इतका बलवान आहे की आज निरपराध लोक तुरुंगात असतील तर उद्या पराक्रमी तुरुंगात असू शकतात आणि सत्ता निरपराधांच्या हातात असू शकते.


 

Power Crisis India : देशात विजेचे संकट गंभीर; 7 वर्षांनंतर पहिल्यांदाच कोल इंडिया कोळसा करणार आयात

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -