घरताज्या घडामोडीAsaduddin Owaisi Attack: गोळीबारानंतर ओवेसी गरजले, मला Z+..., म्हणाले घुटमळत आयुष्य....

Asaduddin Owaisi Attack: गोळीबारानंतर ओवेसी गरजले, मला Z+…, म्हणाले घुटमळत आयुष्य….

Subscribe

AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर काल(गुरूवार) गोळीबार करण्यात आला. हापूर जिल्ह्यातून प्रचारसभेहून परतत असताना त्यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यानंतर ओवेसींच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ओवेसी यांना Z+ सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच ही सुरक्षा संपूर्ण देशभरात दिली जाणार असल्याचे गृह मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, मला Z+ सुरक्षा नको आहे. तसेच मला घुटमळत आयुष्य जगायचं नाहीये. मला फक्त न्याय हवाय, असं वक्तव्य ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत केलंय.

ओवेसी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना धन्यवाद म्हटलं आहे. कारण बिर्ला यांनी फोनकरून ओवेसी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. हे लोकं कोण आहेत, जे गोळ्यांवर विश्वास ठेवतात परंतु बॅलेट पेपरवर नाही. हे लोकं इतके कट्टरवादी झाले असून यांचा संविधानावार विश्वास का नाहीये, असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित लोकसभेत उपस्थित केला.

- Advertisement -

अशा पद्धतीचं राजकारण कसं चालणार?

टोल नाक्यावर गाडी उभी असेल आणि यांसारखी अज्ञात लोकं चार गोळ्या झाडतील, अशा पद्धतीचं राजकारण कसं चालणार?, असे ओवैसी म्हणाले. हे युवा कोणतं पुस्तक वाचून कट्टरवादी झाले आहेत. यांसारखी लोकं कट्टरपंथीय झाल्यामुळे उजव्या विचारसरणीचा साम्यवाद आणि दहशतवाद वाढेल, एनडीए-१ ने जी चूक केली. तीच चूक आता तुम्ही परत करणार आहात का, यामुळे देशाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. असं ओवेसी म्हणाले.

- Advertisement -

मला घुटमळत आयुष्य जगायचं नाहीये, न्याय हवाय

फसबुकवरील क्रिकेट मॅटवर टीका केल्यास यूएपीए का लागू होत नाहीये. त्याच्यावर यूएपीए लावला जाणार नाही का ही गोष्ट मी सरकारकडे सोपवतो. मला मृत्यूची भिती वाटत नाही. मला मला Z+ सुरक्षा नकोय. मला अ वर्गाचा नागरिक बनवा. मी गप्प बसणार नाही. तसेच मला घुटमळत आयुष्य जगायचं नाहीये. मला न्याय हवाय, अशा प्रकारचं आवाहन ओवेसी यांनी लोकसभेत केलं आहे.

दरम्यान , ओवैसी हे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या प्रचारावर आहेत. हापूर जिल्ह्यातून दिल्लीकडे जाताना अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केल्याचा आरोप ओवैसी यांनी केला. ही घटना संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. तसेच यासंदर्भात खासदार ओवेसी यांनी ट्वीटरद्वारे माहिती दिली आहे.


हेही वाचा : Women’s IPL : २०२३ मध्ये महिलांची आयपीएल स्पर्धा सुरू होण्याची शक्यता, सौरव गांगुलीची मोठी घोषणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -