Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश मोदींच्या बांग्लादेश स्वातंत्र्य सत्याग्रहाच्या वक्तव्याचा ओवेसींनी घेतला समचार

मोदींच्या बांग्लादेश स्वातंत्र्य सत्याग्रहाच्या वक्तव्याचा ओवेसींनी घेतला समचार

एखादा मुस्लिम नावाचा मुलगा मंदिरात पाणी मागण्यासाठी गेल्यास त्याला पिटाळून लावले जाते

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. बांग्लादेशचा ५० वा वर्धापन दिन पार पडत आहे. पंतप्रधान मोदींनी बांग्लादेश वर्धापन दिनादरम्यान ढाकामधील एका कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. यावेळी बांग्लादेशच्या स्वातंत्र्या लढ्याबाबत आठवणींना उजाळा दिला. यामध्ये मोदींनी असे म्हटले आहे की, मी २०-२२ वर्षांचा असताना माझ्या सहकाऱ्यांसोबत बांग्लादेशी लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींचा चांगलाच समाचार घेतला आहे. तुम्ही बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढलात मग मुर्शीदाबागच्या नागरिकांना बांग्लादेशी का म्हणतात? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमामध्ये असे बोलले आहेत की, ते २०-२२ वर्षांचे असताना बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला आहे. जर मोदींनी बांग्लादेशसाठी सत्याग्रह केला तर मग मुर्शीदाबादच्या लोकांना बांग्लादेशी का म्हणता? आमच्याबाबत का वाईट बोलता? असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.

- Advertisement -

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, भाजपने देशात खुप द्वेष पसरवला आहे. एखादा मुस्लिम नावाचा मुलगा मंदिरात पाणी मागण्यासाठी गेल्यास त्याला पिटाळून लावले जाते. मुस्लिम लोकांना जिहादी, आदिवासीं लोकांना नक्षलवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारवंतांना देशद्रोही म्हटले जात अल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

- Advertisement -

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी मुर्शीदाबाद येथील एका कार्यक्रमामध्ये भाषण करत होते. यावेळी त्यांनी मोदींनी बांग्लादेश स्वातंत्र्याच्या सत्याग्रहामध्ये सामील झालो होतो या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूकांचे रणधुमाळी सुरु आहे. यादरम्यान राजकीय पक्षांच्या नेत्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या असल्याचे पाहायला मिळते आहे.

- Advertisement -