घरदेश-विदेशनुपूर शर्मांना 6-7 महिन्यात मोठ्या नेत्या बनवले जाईल; ओवैसींनी भाजपावर साधला निशाणा

नुपूर शर्मांना 6-7 महिन्यात मोठ्या नेत्या बनवले जाईल; ओवैसींनी भाजपावर साधला निशाणा

Subscribe

नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्त्याव्यांचा भारतासह जगभरातून तीव्र विरोधात झाला

पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांविरोधात जनभोक्ष उफाळून आला आहे. भारतासह जगभरात नुपूर शर्मांविरोधात तणावाचे वातावरण दिसून येत आहे. या मुदद्यावरून विरोधी पक्षांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही भाजपावर हल्ला केला आहे. यावेळी त्यांनी भाजपचे माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांना अटक करण्याची मागणी केली.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, नुपूर शर्मांना अटक करत भारतीय कायद्यानुसार त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली आहे. भारतीय संविधानानुसार कारवाईची मागणी करतोय. मला माहीत आहे, येणाऱ्या पुढील सहा- सात महिन्यांत नुपूर शर्मा यांना मोठ्या नेत्या बनवले जाईल, त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी देखील उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. नुपूर शर्मांना भाजपकडून पाठींबा मिळत आहे. आम्ही पंतप्रधानांना मागणी करूनही ते यावर एक शद्बही बोलायला तयार नाहीत.

- Advertisement -

हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयीच्या वादग्रस्त वक्त्यामुळे आसाम काँग्रेसने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीच्या दोन नेत्यांनी हा FIR नोंदवला आहे.

नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्त्याव्यांचा भारतासह जगभरातून तीव्र विरोधात झाला. विशेषत: मुस्लीम देशांमध्ये नुपूर शर्मांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध झाला, अनेक देशांत याविरोधात मोर्चे, आंदोलन, जाळफोळीच्या घटना घडल्या. अखेर वाढत्या विरोधानंतर भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना पक्षातून निलंबित केले.

- Advertisement -

बांगलादेशच्या पंतप्रधानांकडून भारताच्या पंतप्रधानांसाठी आंब्याची खास भेट, काय आहे कारण?


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -