घरCORONA UPDATEनिगेटिव्ह टेस्टनंतरही मरकजच्या लोकांना डिस्चार्ज का नाही?; ओवैसींचा सवाल

निगेटिव्ह टेस्टनंतरही मरकजच्या लोकांना डिस्चार्ज का नाही?; ओवैसींचा सवाल

Subscribe

तबलीगी जमातीच्या लोकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना घरी सोडण्यात आलेलं नाही. यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी दिल्ली सरकारला सवाल केला आहे.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मरकजमधील लोकांवरुन दिल्ली सरकारवर आरोप केला आहे. तबलीगी जमातीच्या लोकांना निगेटिव्ह चाचणी आल्यानंतरही जबरदस्तीने क्वारंटाईन केलं आहे. क्वारंटाईनचा कालावधी दोनदा पूर्ण केला आहे. तरी देखील त्यांना सोडलं जात नाही आहे. असं का? असा सवाल ओवैसींनी केला आहे.

ओवेसी यांनी एक ट्विट करत म्हटलं आहे की, “निजामुद्दीनमधील मरकजच्या लोकांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही का डिस्चार्ज दिला जात नाही? त्यांनी आवश्यक क्वारंटाईन कालावधी दोनदा पूर्ण केला आहे, परंतु दिल्ली सरकार त्यांना सोडण्यास परवानगी देत ​​नाही. ते ३१ मार्चपासून तिथे आहेत आणि त्यांना त्वरित सोडण्यात यावं.”

- Advertisement -

भारतात कोरोनाव्हायरस महामारीच्या काळात निजामुद्दीन मरकज आणि तबलीगी जमात चर्चेत आली. निजामुद्दीन मरकजमध्ये तबलीगी जमात कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते आणि त्यापैकी बरेच जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. ज्यांनी जमात कार्यक्रमात भाग घेतला ते नंतर त्यांच्या राज्यात परत गेले. जिथे कोरोनाच्या प्रकरणांची संख्या इतर लोकांशी संपर्कात आल्यामुळे वाढली होती.


हेही वाचा – मालदीव, युएईमध्ये अडकलेल्या नागरिकांना भारतात आणणार, नौदलाने पाठवली तीन जहाजं

- Advertisement -

देशात कोविड -१९ संक्रमित रुग्णांची संख्या ४६ हजारच्या वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १,५७२ लोकांचा मृत्यू झाला आहे तर संसर्ग झालेल्यांची संख्या, ४६,५४१ वर पोहोचली आहे. तथापि, आतापर्यंत १२,९१९ रूग्ण बरे झाले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -