घरदेश-विदेशआसाराम बापू आणखी एका बलात्काराच्या आरोपात दोषी, उद्या मिळणार शिक्षा

आसाराम बापू आणखी एका बलात्काराच्या आरोपात दोषी, उद्या मिळणार शिक्षा

Subscribe

Asaram Bapu Rape Case | सरकारी वकील आर.सी.कोडेकर यांनी सोमवारी म्हटलं की, न्यायालयाने या खटल्याप्रकरणी आसाराम बापूला भारतीय दंड संहिता कलम ३७६ (२) (सी), ३७७ (अप्राकृतिक यौनाचार) आणि अवैध रुपाने बंदिस्त ठेवल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

Asaram Bapu Rape Case | अहमदाबाद – बलात्कार प्रकरणात (Rape Case) जोधपूरमध्ये आजन्म कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या आसाराम बापूवर आता आणखी एका बलात्काराच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवण्यात आलं आहे. गांधी नगरच्या सत्र न्यायालायने हा निर्वाळा दिला असून याप्रकरणी उद्या शिक्षेची सुनावणी होणार आहे. दरम्यान, पुराव्यांअभावी आसारामच्या पत्नीसह सहा आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे.

२००१ ते २००६ या पाच वर्षांच्या कालावधीत आसाराम बापूने त्याच्या सूरत येथे राहणाऱ्या महिला शिष्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणी ऑक्टोबर २०१३ मध्ये आसाराम बापूसह सात जणांवर बलात्कार आणि अवैधरित्या बंदिस्त ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. तर, २०१४ मध्ये याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. याप्रकरणी सरकारी वकील आर.सी.कोडेकर यांनी सोमवारी म्हटलं की, न्यायालयाने या खटल्याप्रकरणी आसाराम बापूला भारतीय दंड संहिता कलम ३७६ (२) (सी), ३७७ (अप्राकृतिक यौनाचार) आणि अवैध रुपाने बंदिस्त ठेवल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Dead Body In Ashram : आसाराम बापूच्या आश्रमात सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; पोलिसांकडून आश्रम सील

बलात्कार, अनैसर्गिक संबंध, गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे आदी आरोप आसाराम बापूवर ठेवण्यात आले आहेत. तसंच, आसाराम बापूच्या पत्नी आणि मुलीवरही असेच आरोप करण्यात आले आहेत. परंतु, पुराव्यांअभावी त्यांना निर्दोष सोडण्यात आले आहे. तर, आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याच्याविरोधातील गुन्हा सिद्ध झाला आहे. दोघांवरही बलात्कार, लैंगिक अत्याचार, बंदिस्त करून ठेवण्यासारख्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सारामविरोधातील तक्रारी अहमदाबादच्या चांदखेडा पोलीस ठाण्यात स्थलांतरीत करण्यात आल्या. कारण या घटना तेथील आश्रमात घडल्या होत्या.

- Advertisement -

२०१३ मध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूरच्या सत्र न्यायालायने आसारामला २०१८ मध्येच आजन्म कारावसाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे सध्या तो जोधपूरच्या तुरुंगात आहे. आता त्याच्यावरील बलात्काराचा आणखी एक गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत त्याला कोणती शिक्षा मिळतेय हे पाहावं लागेल.

कोण आहे आसाराम बापू

आसाराम बापूला कधीकळी आध्यात्मिक गुरू म्हणून लोकमान्यता मिळाली होती. देशभरात त्याचे असंख्य भक्त होते. आसुमल थाऊमल सिरुमलानी असं त्याचं खरं नाव आहे. आसाराम बापू याचा जन्म सिंध प्रांतातील नवाब जिल्ह्यातील बेरानी या लहानशा खेड्यात झाला. त्याच्या जन्मावेळी एका पाळण्यावाल्याला साक्षात्कार झाला होता. या गावात कोणीतरी संत जन्म घेणार असल्याचा तो साक्षात्कार होता. तेव्हापासून आसाराम बापूची अख्यायिका सांगितली जाते. मात्र, त्याने अनेकींवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -