Homeदेश-विदेशAsaram Bapu : आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, सशर्त जामीन मंजूर

Asaram Bapu : आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, सशर्त जामीन मंजूर

Subscribe

बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आसाराम तुरुंगात आहे. पण आता दोन महिन्यांसाठी त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे.

नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आसाराम तुरुंगात आहे. पण आता दोन महिन्यांसाठी त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे. कारण आसाराम बापूला मंगळवारी (ता. 07 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या कालावधीत त्यांना जामीनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. जामीनादरम्यान आसाराम त्याच्या कोणत्याही अनुयायाला भेटू शकणार नाही. त्याला 31 मार्चपर्यंत तुरुंगातून बाहेर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Asaram Bapu granted conditional bail from Supreme Court)

आसाराम बापूचे वय हे 85 वर्ष असून तो 2013 पासून जोधपूर तुरुंगात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये शिक्षा भोगत आहे. त्याला 2013 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूरमधून अटक करण्यात आली होती. आसारामने आपल्या आश्रमातच एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पाच वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर 25 एप्रिल 2018 रोजी न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय दुसऱ्या एका प्रकरणातही आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 31 जानेवारी 2023 रोजी न्यायालयाने आसारामला या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

हेही वाचा… Crime News : परजातीय मुलावर प्रेम, विसरून जात नसल्यानं भावानं बहिणीला डोंगरावर नेलं अन्…; संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

सध्या आसाराम बापूवर जोधपूर आरोग्य मेडीकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. पण जन्मठेपेच्या शिक्षेसाठी त्याला जोधपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. पण काही महिन्यांपूर्वी त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून ‘भगत की कोठी’ येथील आरोग्य सेवा केंद्रात दाखल करण्यात आले होते. 18 डिसेंबर रोजीच सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूला 18 दिवसांचा पॅरोल दिला होता. त्यानंतर 01 जानेवारीला तो जोधपूर कारागृहात परतला. पण आता पुन्हा आसाराम बापूला अंतरिम जामीन देण्यात आला आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात वैद्यकीय उपचारांसाठी राजस्थान उच्च न्यायालयाने त्याला सात दिवसांचा पॅरोल दिला होता. त्यावेळी त्याला खालापूर तालुक्यातील माधवबाग वैद्यकीय केंद्रात हृदयविकाराच्या उपचारासाठी आणले होते. वास्तविक त्याच्यावर 6 दिवस उपचार केले जाणार होते. प्रत्यक्षात 12 दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर आसाराम बापूची पुन्हा जोधपूरमधील जेलमध्ये रवानगी करण्यात आली.