Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश आसाराम बापूला जन्मठेप! इतर दोन दोषींनाही २० वर्षांची शिक्षा

आसाराम बापूला जन्मठेप! इतर दोन दोषींनाही २० वर्षांची शिक्षा

Related Story

- Advertisement -

स्वयंघोषित वादग्रस्त आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जोधपूर कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २०१३ साली अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी राजस्थानमध्ये अटक झालेल्या आसाराम बापूला अखेर आज जोधपूरच्या अनुसूचित जाती आणि जमाती विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली. सहआरोपी हॉस्टेल वॉर्डन शिल्पी आणि हॉस्टेल डायरेक्टर शरदचंद्र यांना २०-२० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जोधपूर कोर्टाचे न्यायाधीश मधुसूदन शर्मा यांनीही शिक्षा सुनावली.

राजस्थान आणि गुजरात येथील दोन वेगवेगळ्या प्रकरणांत आसाराम यांचा समावेश असल्याप्रकरणी तपास सुरू होता. राजस्थानात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार शाहजहाँपूर येथील एका अल्पवयीन मुलीने आसारामवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. पीडित मुलीने जोधपूर जवळील मनई गावातील आश्रमात १५ ऑगस्ट २०१३च्या रात्री हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

आसाराम बापूची जन्मठेप राजस्थान, हरयाणा, मप्र राज्यातील निवडणुकांवर परिणाम करेल?

तर गुजरातमध्ये सूरतच्या दोन बहिणींनी आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साईविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. या संपूर्ण प्रकरणात एकूण ५ जण आरोपी होते. त्यापैकी दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा महत्वाचा निकाल देण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव मध्य कारागृहातच न्यायालय भरवण्यात आले होते.

- Advertisement -

बाबा राम रहीमच्या शिक्षेच्या सुनावणीनंतर झालेल्या हिंसाचारामुळे प्रशासनाने यंदा खबरदारी घेत संपूर्ण जोधपूर शहरात ३० एप्रिलपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी फ्लॅग मार्च करत येणाऱ्या लोकांची चौकशी सुरू केली आहे. तर आसारामचे जोधपूरमधील आश्रम रिकामे करण्यात आले आहे.

आश्रम ते तुरुंग… भारतातील भोंदूबाबांचा रंजक प्रवास

- Advertisement -