Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश आसाराम बापूंची प्रकृती बिघडली; जोधपूर तुरूंगातून हॉस्पिटलमध्ये भर्ती

आसाराम बापूंची प्रकृती बिघडली; जोधपूर तुरूंगातून हॉस्पिटलमध्ये भर्ती

Related Story

- Advertisement -

अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याबद्दल जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंची मंगळवारी रात्री अचानक प्रकृती खालावली. आसाराम यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच तुरूंग प्रशासने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले मात्र त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्यांना महात्मा गांधी हॉस्पिटलमधून माथुर हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आसाराम बापू तुरूंगात कैद असताना मंगळवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. आसाराम यांना रक्त दाबाचा त्रास असून त्यांना श्वास घेण्यास अडथळा येत होता. तसेच त्यांच्या छातीतही वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये अनेक तपासण्या केल्यानंतर आसाराम यांना मथुरादास माथूर हॉस्पिटलच्या सीसीयू वॉर्डमध्ये हलविण्यात आले. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर आसाराम यांची रक्त तपासणी करणात आली आणि एक्सरे काढण्यात आला. डॉक्टरांनी आसाराम बापूंना क्रिटीकल केयर युनिटमध्ये दाखल केले. स्वयंमघोषित देव असणाऱ्या आसारम बापूंची तब्येत खालवल्याचे समजताच भाविकांसह समर्थकांनी त्यांना दाखल करण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली. मात्र पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

- Advertisement -