राजधानी दिल्लीत रंगला 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा, ‘या’ सिनेमा आणि कलाकारांनी स्वीकारला पुरस्कार

asha parekh honored with dada saheb phalke award 2022 goshta eka paithanichi ajay devgn vishal bhardwaj receives national award 2022 see list

भारतीय सिनेक्षेत्रात मानाचा समजला जाणारा 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज नवी दिल्लीत पार पडला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात (68th National Film Awards 2022 ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना (Asha Parekh) ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने (Dada Saheb Phalke Award) सन्मानित करण्यात आले आहे.

यात ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ठ मराठी सिनेमाचा पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले आहे. तर राहुल देशपांडे यांना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मी वसंतराव या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट गायकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर गोदाकाठ आणि अवांछित या सिनेमासाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहेत. याशिवाय जून सिनेमासाठी अभिनेता सिद्धार्थ मेननला विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्रदान करत सन्मानित करण्यात आला आहे.

बॉलिवूडच्या तान्हाजी या हिंदी चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि साऊथ सुपरस्टार सूर्या याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर Films_Division द्वारे निर्मित व्हिलिंग द बॉल चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अन्वेषण/ साहसी चित्रपट पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तर ‘टक-टक’ या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी अनिश मंगेश गोसावी याला ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार’ पुरस्कार देत सन्मानित केले आहे.

या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तामिळ, तेलुगू अशा अनेक भाषांसह प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटांना आणि कलाकारांना सन्मानित करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमा : तान्हाजी

सर्वोत्कृष्ट अभिनेता : अजय देवगण (तान्हाजी), साऊथ स्टार सूर्या (सूराराई पोट्ट्रू)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: अपर्णा बालमुरली, सूराराई पोट्ट्रू

सर्वोत्कृष्ट बालकलाकार मराठी सिनेमा : अनिश गोसावी (टकटक), आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर (सुमी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: मी वसंतरावसाठी राहुल देशपांडे आणि तक्तकसाठी अनिश मंगेश गोसावी

उल्लेखनीय फिचर फिल्म : जून (मराठी), गोदाकाठ (मराठी), अवांछित (मराठी)

सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमा : फनरल (मराठी)

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: सूराराई पोट्ट्रू

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सच्चिदानंदन केआर, अय्यप्पनम कोशियुम

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: बिजू मेनन, अय्यप्पनम कोशियम

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: लक्ष्मी प्रिया चंद्रमौली, शिवरंजनियुम इनम सिला पेंगलम

सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन दिग्दर्शन पुरस्कार: एके अय्यप्पनम कोशियुम

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: नाट्यम (तेलुगु)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: नंचम्मा, अय्यप्पनम कोशियम

सर्वोत्कृष्ट वेशभूषा : तान्हाजी

सर्वोत्कृष्ट गीतकार : मनोज मुन्तशिर

चित्रपटांसाठी अनुकूल राज्य : मध्यप्रदेश