घरताज्या घडामोडीराजस्थान काँग्रेसमध्ये भूकंप; पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदाला गेहलोत समर्थक आमदारांचा विरोध

राजस्थान काँग्रेसमध्ये भूकंप; पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदाला गेहलोत समर्थक आमदारांचा विरोध

Subscribe

राजस्थानमधील राजकारणात मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत  हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. परंतु गेहलोत यांनी राजीनामा दिल्यानंतर राजस्थानचा नवा मुख्यमंत्री कोण होणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परंतु नव्या मुख्यमंत्रिपदासाठी सचिन पायलट यांचं नाव समोर येत आहे. मात्र सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी गेहलोत समर्थक आमदारांकडून विरोध केला जात आहे.

याच मुद्द्यावर गेहलोत गटाच्या तब्बल 92 आमदारांनी आपला राजीनामा दिला आहे. 92 आमदारांनी राजीनामा दिल्यानं राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार अस्थिर बनले आहे. या बंडखोर आमदारांसोबत पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरू आहे. या आमदारांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसमोर दोन प्रमुख अटी ठेवल्या आहेत.

- Advertisement -

2020 च्या राजकीय संकटात सरकार वाचवण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांना मुख्यमंत्री बनवावं, अशी पहिली अट आमदारांनी घातली आहे. तर जोपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होत नाही, तोपर्यंत आमदारांची बैठक बोलावू नये, अशी दुसरी अट ठेवण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आज सचिन पायलट हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तर गेहलोत समर्थक आमदारांनी सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध केल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

शशी थरूर उतरणार काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात

काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर यांनी 24 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागवला. त्यामुळे ते अधिकृतपणे अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या G-23 गटातील प्रमुख सदस्य असलेल्या शशी थरूर यांनी या पदासाठी निवडणूक लढवण्याचा आपला इरादा जाहीर केला. हे पद दीर्घकाळ गांधी परिवाराकडे आहे. गेल्या 25 वर्षांपासून अध्यक्षपद सोनिया गांधी किंवा त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्याकडे आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मधुसूदन मिसरी यांच्याकडून उमेदवारी अर्ज घेण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी पाठवला आहे.


हेही वाचा : प्रवाशांसाठी खूशखबर! नवरात्रीत रेल्वेने जेवणासाठी सुरू केली खास सुविधा, जाणून घ्या…


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -