Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश सोनिया गांधींना भेटण्यासाठी अशोक गेहलोत जनपथवर; पक्षांतर्गत पेच संपवण्यावर केली चर्चा

सोनिया गांधींना भेटण्यासाठी अशोक गेहलोत जनपथवर; पक्षांतर्गत पेच संपवण्यावर केली चर्चा

Subscribe

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरु असलेले राजकारण आणि राजस्थानमधील पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गहलोत आज सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी जनपथवर पोहोचले आहेत. गहलोत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेत पक्षांतर्गत सुरु असलेला पेचप्रसंग संपवण्याचा प्रयत्न करतील असे मानले जात आहे. गेहलोत बुधवारी रात्री दिल्लीत पोहचले आणि त्यांनी सोनिया गांधींच्या नेतृत्त्वाचे कौतुक केल तसेच घरातील चर्चा प्रश्न मार्गी लागतील अशी आशा व्यक्त केली, पक्षाच्या राजस्थान युनिटमध्ये पेच निर्माण झाल्यानंतर गेहलोत पहिल्यांदाच दिल्लीत पोहचले आहेत.

दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांनी विमानतळावर पत्रकारांना सांगितले की, मी इंदिराजींच्या काळापासून पाहत आलो आहे. पक्षात नेहमीच शिस्त असते. त्यामुळे पक्षाचे 44 खासदार आले किंवा 52 आले, पण संपूर्ण देशात तो राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याच्या नेत्या सोनिया गांधी आहेत. सोनिया गांधींच्या शिस्तीत संपूर्ण देशात काँग्रेस आहे. अशा छोट्या-छोट्या घटना घडत राहतात. माझा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, मात्र आपल्या सर्वांच्या हृदयात असलेली पहिली गोष्ट असे की, आम्ही काँग्रेस अध्यक्षांच्या शिस्तीत काम करतो. माझ्या मते येत्या काळात निर्णय घेतला जाईल.

- Advertisement -

गेहलोत पुढे म्हणाले की, हा (राजकीय पेचप्रसंग) घरचा विषय आहे, अंतर्गत राजकारण सुरु असते. आम्ही सर्वजण मिळून ते प्रश्न सोडवू. या संकटामुळे गेहलोत यांच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याच्या शक्यतेला मोठा धक्का बसला आहे. आता पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा सदस्य शशी थरूर 30 सप्टेंबर रोजी सभापतीपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 22 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 24 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल.

- Advertisement -

राजस्थानमधील राजकीय संकटादरम्यान, पक्ष निरीक्षकांनी मंगळवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळच्या तीन नेत्यांवर “घोर अनुशासनात्मक” केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली आणि पक्षाच्या शिस्तभंग कृती समितीने लगेचच त्यांना “कारणे दाखवा नोटीस” बजावली आहे.

राजस्थानचे कॅबिनेट मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी बुधवारी जयपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले की, “नेतृत्व आणि संघटनेचे पालक म्हणून 102 आमदारांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री आज संध्याकाळी दिल्लीला जात आहेत. मुख्यमंत्री अद्याप राजीनामा देत नाहीत. गेहलोत पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज भरणार की नाही, हे हायकमांडसोबतच्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल, तसे, नुकतेच गेहलोत यांनी पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज भरणार असल्याचे सांगितले होते. मात्र राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींमुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


पीएफआयवर ट्विटरचीही मोठी कारवाई; संघटनेसह पदाधिकाऱ्यांचे ट्विटर हँडल बंद

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -