घरदेश-विदेशकाँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांचा पत्ता कट?

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांचा पत्ता कट?

Subscribe

नवी दिल्ली – गेल्या अनेक वर्षांपासून गांधी कुटुंबाकडे असलेलं काँग्रेसचं अध्यक्षपद आता गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला मिळणार असल्याची चर्चा होती. याकरता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, आता अशोक गेहलोत यांचं नाव स्पर्धेतून बाहेर आलं आहे. त्यामुळे काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
काँग्रेसच्या पुढील अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींनी अशोक गेहलोत यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा देण्याचं ठरवलं होतं, असं सुत्रांनी सांगितलं.

पुढच्या अध्यक्षपदासाठी तुम्ही उत्सुक आहात का असं अशोक गेहलोत यांना विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी सुरुवातीला नाखुशी व्यक्त केली होती. पक्षाने जबाबदारी दिली तर स्विकारेन असंही ते म्हणाले होते. दरम्यान, “२८ ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लागणार आहे. तेव्हाच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जाहीर होईल. मी तुमच्यासोबत आहे. मी तुमच्यापासून दूर जाणार नाही. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या प्रदेशातून दूर जाणार नाही. कोणतीही जबाबादारी आली तरी मी दूर जाणार नाही. या प्रदेशातील परिस्थिती मी लहानपणापासून पाहिली आहे. त्यामुळे या प्रदेशापासून मी दूर जाणार नाही”, असं अशोक गेहलोत यांनी राजस्थानमध्ये म्हटलं. त्यामुळे त्यांच्या एकूणच वक्तव्यावरून अशोक गेहलोत अध्यक्ष होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

- Advertisement -

तर, दुसरीकडे अशोक गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास राजस्थानची धुरा सचिन पायलट यांच्याकडे जाईल. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांचे संबंध सर्वांनाच माहित आहेत. त्यामुळे राजस्थानची जबाबदारी सचिन पायलटकडे जाऊ नये अशी अशोक गेहलोत यांची भूमिका आहे. त्यामुळे  कदाचित काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची जबाबदारी स्विकारण्यास अशोक गेहलोत नाखूष असतील असं राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.

सोनिया गांधी यांनी २०१० साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांचे पूत्र राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खालल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत. मात्र, आता त्यांची प्रकृती साथ देत नसल्याने त्या उपचारांसाठी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत परदेशात जाणार आहेत. या काळात काँग्रेसची धुरा कोणाच्या हाती येणार यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -