Homeक्रीडाAshwin on Hindi : हिंदी राष्ट्रीय भाषा नाही तर...; आर अश्विनच्या विधानाची...

Ashwin on Hindi : हिंदी राष्ट्रीय भाषा नाही तर…; आर अश्विनच्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा

Subscribe

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षापासून हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे की नाही? यावरून वाद सुरू आहे. हा वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच क्रिकेटमधून निवृत्त झालेला भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आर अश्विन याने एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने केलेल्या एका विधानामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘हिंदी ही देशाची राष्ट्रीय भाषा नाही,’ असे विधान त्याने केले. विशेष म्हणजे 10 जानेवारी हा विश्व हिंदी दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. अशामध्येच अश्विनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. (Ashwin statement Hindi is not national language created chaos on social media)

हेही वाचा : Raj Thackeray : “हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हेच…”, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले 

चेन्नईममध्ये एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना अश्विन विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की कोणाला हिंदीमध्ये प्रश्न विचारण्यात रस आहे का? यावेळी कोणीही हिंदीमध्ये प्रश्न विचारण्यास स्वारस्य दाखवले नाही. यानंतर अश्विन म्हणाला, “मला असे विचारावेसे वाटले. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, ती अधिकृत (फक्त कामाची) भाषा आहे.” त्याच्या या विधानाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली.

एका युझरने यावर लिहिले आहे की, “प्रिय दक्षिण भारतीय, खासकरून तमिळ भाषिक लोकांनो, तुम्ही क्रिकेट खेळू नका, कारण त्यात बहुसंख्य खेळाडू हे हिंदी भाषिक आहेत. तसेच, जे संघांचे मालक हिंदी भाषेत संवाद साधण्याचा पर्याय पसंत करतात, त्यांच्यासाठी कृपया आयपीएल खेळणे थांबवा. तर, कृपया टेक कंपन्यांच्या सीईओ पदांचा आनंद घ्या आणि फक्त तुमच्या मालकीच्या खेळाडूंनाच कामावर ठेवा.” असे म्हणत त्याने टीका केली आहे.

विशेष म्हणजे भारतीय क्रिकेटपटू आर अश्विनचा चाहता असलेल्या एका युझरनेदेखील त्याच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली. “अश्विन असा का म्हणाला? मी त्याचा एक चाहता आहे, पण मला हे नाही आवडले. त्याला क्रिकेटपटू म्हणूनच राहू द्या. तुम्ही जेवढ्या भाषा शिकाल, तेवढ्या चांगल्या. आजकाल आमच्या फोनमध्ये कोणत्याही भाषेचे भाषांतर लगेच उपलब्ध होते. मग काय अडचण आहे? भाषेचा प्रश्न हा ज्या त्या लोकांवर सोडावा.” असे म्हणत त्या युझरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.