घरताज्या घडामोडीव्हिएतनाम: मंदिर परिसरातील उत्खननादरम्यान ९व्या शतकातील सापडले शिवलिंग!

व्हिएतनाम: मंदिर परिसरातील उत्खननादरम्यान ९व्या शतकातील सापडले शिवलिंग!

Subscribe

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाला उत्खननादरम्यान व्हिएतनाममधील माई सोन परिसरात ९ व्या शतकातील हिंदू देवतांचे शिवलिंग आढळले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी ट्विटरवर यासंदर्भातील माहिती दिली आहे. या शोधाला भारताच्या विकास भागीदारीला एक महान सांस्कृतिक उदाहरण म्हटले.

एस जयशंकर यांनी ट्विट करताना लिहिले की, ‘९ व्या शतकातील अखंड बलुओ पाषाणातील शिवलिंग व्हिएतनामच्या माई सोन मंदित परिसरात सुरू असलेल्या संवर्धन प्रकल्पातील नवीन शोध आहे. पुरातत्व विभागाच्या पथकाने अभिनंदन.’ २०११ मध्ये या अभयारण्यातील स्वतःच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा त्यांनी उत्खननाची छायाचित्र ट्विट करत दिला आहे.

- Advertisement -

उत्खननादरम्यान हे शिवलिंग बलुआ पाषाणाचे असून त्याला कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. मध्य व्हिएतनामच्या क्वांग प्रांतातील दुय फू गावात हे मंदिर स्थित आहे. ९ व्या शतकात राजा इंद्रवर्मन दोनच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधले होते. व्हिएतनामच्या माई सोन मंदिरावर हिंदू प्रभाव असून येथे कृष्ण, विष्णू-शिव यांच्या मृर्त्या आहेत.

- Advertisement -

यापूर्वीही व्हिएतनाममध्ये चौथ्यापासून १३व्या शतकापर्यंतच्या बौद्ध तसेच हिंदू धर्माशी संबंधित कलाकृती मिळाल्या होत्या. यामध्ये भगवान राम आणि देवी सीता यांच्या लग्न सोहळ्याचे शिल्प आणि नक्षीदार शिवलिंगाचा समावेश आहे. यापूर्वी माई सोन मंदिर परिसरात सहा शिवलिंग सापडले होते, अशी एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – Coronavirus: WHO सर्व सामान्य लोकांकडून देखील घेणार निधी!


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -