घरदेश-विदेशAssam Flood Crisis : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, 7 लाखांहून अधिक बाधित; 9...

Assam Flood Crisis : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, 7 लाखांहून अधिक बाधित; 9 जणांचा मृत्यू

Subscribe

आसाममधील पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून गुरुवारी परिस्थिती आणखीनचं बिकट झाली, यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यातील 27 जिल्हे आणि तिथे राहणाऱ्या सुमारे 7.18 लाख स्थानिक नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनिक पुर अहवालानुसार, नागाव जिल्ह्यातील कांपूर महसूल क्षेत्रात बुडून एकाचा मृत्यू झाला. तर कामपूरमध्येही दोन जण बेपत्ता झाले आहेत. यासह राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता दहाच्यावर पोहचली आहे. असेही अहवालात म्हटले आहे. प्राधिकरणाने म्हटले की, पुरामुळे राज्यात 7,17,500 हून अधिक लोक बाधित झाले आहेत.

दरम्यान बजली, बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोनगाईगाव, कचार, दरांग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगड, दिमा हासाओ, गोलपारा, हैलाकांडी, होजाई, कामरूप, कामरूप महानगर, कार्बी आंगलाँग वेस्ट, करीमगंज, कोकराझार, लखीमपूर, माजुली, मोरीगावं, नागांव, नलबाडी, सोनितपूर आणि उदलगुरी जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.

- Advertisement -

नगांवमध्ये सर्वाधिक 3.31 लाख लोक बाधित झाले आहेत. त्यापाठोपाठ कचार (1.6 लाख) आणि होजाली (97,300) यांचा क्रमांक लागतो. बुधवारपर्यंत राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 6.62 लाख लोक बाधित झाले आहेत.

प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सध्या 1790 गावे पाण्याखील गेली आहेत. तर संपूर्ण राज्यात 63,970.62 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 359 मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे चालवत आहेत, जिथे 80,298 लोकांना मदत केली जात असून यामध्ये 12,855 मुलांचा समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान आसाममध्ये आता लष्कर, निमलष्करी दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, नागरी प्रशासन, प्रशिक्षित स्वयंसेवक, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि स्थानिक लोकांनी बोटी आणि हेलिकॉप्टरचा वापर करून 7,334 लोकांना विविध पूरग्रस्त भागातून बाहेर काढले आहे.


Live Update : जम्मू -श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला, बचावकार्य सुरु

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -