आसाममध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या दोन पोलिसांचा मृत्यू

मागील अनेक दिवसांपासून आसममध्ये (Asam) मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे आसाममधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुरामुळे अनेक गावांचे संपर्क तुटल्याने आपत्ती निवारण आणि पोलीस दलाच्या मदतीने वेगाने बचावकार्य सुरू आहे.

Asam Flood

मागील अनेक दिवसांपासून आसममध्ये (Asam) मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे आसाममधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुरामुळे अनेक गावांचे संपर्क तुटल्याने आपत्ती निवारण आणि पोलीस दलाच्या मदतीने वेगाने बचावकार्य सुरू आहे. परंतु, या पुरग्रस्तांना बचाव करणे दोन पोलिसांच्या जीवावर बेतले आहे. नदीला आलेल्या पुरामुळे दोन पोलिसांनाच आपला जीव गमवावा लागला. रविवारी रात्री उशीरा ही दुर्घटना घडल्याचे समजते. आसामच्या नागाव जिल्ह्यात ही घटना घडली. वाहून गेलेल्या पोलिसांचे सोमवारी त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशीरा पुराची माहिती मिळाल्यानंतर कामपूर पोलीस (Kampur Police) स्टेशनचे अधिकारी सॅम्युजल काकोती चार पोलिसांसह बोटीने पाचोनिजार मधुपूर गावात पोहोचले. याच दरम्यान पोलीस कर्मचारी पुराच्या पाण्याने वाहणाऱ्या नदीत पडले आणि प्रवाहात वाहून गेले. दोन पोलिसांची सुटका करण्यात आली, मात्र उर्वरित दोघांचा शोध लागू शकला नाही. जवानांनी अथक प्रयत्नांनंतर सोमवारी पहाटे पोलीस ठाणे प्रभारी काकोती यांचा मृतदेह अनेक तासांच्या शोधानंतर बाहेर काढण्यात आला.

हेही वाचा – Northeast Flood : आसाम- मेघालयमध्ये पावसाचा इशारा; आतापर्यंत 62 जणांचा मृत्यू; ऑरेंज अलर्ट जारी

राजीव बोरदोलोई असे दुसऱ्या मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव आहे. दरम्यान, आसाममध्ये सध्या पावसाने थैमान घातले आहे. आपत्ती निवारण आणि पोलीस दलाच्या मदतीने वेगाने बचावकार्य सुरू आहे. शिवाय, मुसळधार पावसामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झाले असून लाखो लोकांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

नागाव जिल्ह्याला (Nagaon District) आसाममधील पुराचा मोठा फटका बसला आहे. कामपूरमधील कोपिली नदीला आलेल्या पुरामुळे सुमारे ३,६४,४५९ लोक बाधित झाले आहेत. ३४ जिल्ह्यांमध्ये एकूण ४२,२८,१५७ लोक बाधित झाले असून पुरामुळे ७१ लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते.


हेही वाचा – धक्कादायक! सांगलीतील मिरजेत विष प्राशन करून ९ जणांची सामूहिक आत्महत्या