Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी चार राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात मतदान सुरू, रेकॉर्ड ब्रेक मतदान करण्याचे मोदींचे...

चार राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात मतदान सुरू, रेकॉर्ड ब्रेक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन

Related Story

- Advertisement -

आज पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एकूण ४७५ विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरू असून ३१ जागांवर मतदान होत आहे. तर आसाममध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात १२६ विधानसभा जागेतील ४० जागांवर मतदार आपला हक्क बजावत आहेत. तसेच तामिळनाडूमध्ये २३४, केरळमध्ये १४० आणि पुद्दुचेरीमध्ये ३० जागांवर मतदान होत आहे. याशिवाय मल्लपूरम आणि कन्याकुमार या दोन जागांसाठी देखील मतदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार भाषेत ट्वीट केलं. नरेंद्र मोदी यांनी मतदारांना रेकॉर्डब्रेक मतदान करण्याचे आवाहन केले आहे. खासकरून त्यांनी तरुण मंडळींना मतदान करण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

 

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यात सुद्धा हिंसक वातावरण असल्याचे समोर आले आहे. उलबेरियामध्ये तृणमूल नेत्यांच्या घरी इव्हीएम आणि वीवीपॅट मिळल्याने एकच खळबळ माजली आहे. तिसऱ्या टप्प्यातील तीन जिल्हे हावडा, हूघ्ली आणि दक्षिण २४ परगनाच्या ३१ जागांवर एकूण २०५ उमेदवार मैदानात उतरले आहेत. हावडाचे सात, हूघ्लीचे आठ, आणि दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील १६ जागा आहेत. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत या ३१ जागांवरील ३० जागांवर तृणमूल काँग्रेसने वर्चस्व मिळवले होते. फक्त एकच जागा काँग्रेसने जिंकली होती. सकाळी ९ वाजून ११ मिनिटांपर्यंत पश्चिम बंगालमध्ये ४.८८ टक्के मतदान झाले, अशी निवडणूक आयोगाने माहिती दिली.

- Advertisement -

आसाम विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यावेळी निवडणुकीत प्रमुख संघर्ष भाजप आणि काँग्रेसप्रणीत युती यांच्या दिसणार आहे. भाजपसोबत आसाम गण परिषद (AGP) आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL) यांची युती आहे. तर काँग्रेससोबत अखिल भारतीय यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (AIUDF), भारतीय कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेश, आंचलिक गण मार्च (AGM) आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट (BPF) या सर्वांची युती आहे. हा टप्प्या भाजपचे नेते हिमंत बिस्वा सरमा यांच्यासह राज्यातील १२ जिल्ह्यांमधील ३३७ उमेदवारांचे भवितव्य ठरवले. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार ९ वाजून २८ मिनिटांपर्यंत आसाममध्ये १२.८३ टक्के मतदान पार पडले आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, सकाळी १० वाजेपर्यंत तामिळनाडूत ७.३६ टक्के, केरळमध्ये १५.३३ टक्के, पुद्दुचेरीमध्ये १५.६३ टक्के मतदान पार पडले आहे. दरम्यान तामिळनाडूचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल तमिलिसै सौंदरराजन यांनी आपल्या मतदान हक्क बजावला आहे. याशिवाय अभिनेते रजनीकांत यांनी मतदान केले आहे. तसेच अभिनेते कमल हासन यांना आपल्या मुलींसोबत मतदान केले.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता विजय चेन्नईतल्या वेल्स इंटरनॅशनल प्री स्कू, नीलांकरायमध्ये मतदान केंद्रावर सायकलवरून गेला. यादरम्यान विजयचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


हेही वाचा – पंतप्रधान मोदी येत्या ७ एप्रिलला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार


 

- Advertisement -