घरAssembly Battle 2022Assembly Election 2022 : यूपीत 61.8 टक्के तर उत्तराखंडमध्ये 59.5 टक्के मतदान,...

Assembly Election 2022 : यूपीत 61.8 टक्के तर उत्तराखंडमध्ये 59.5 टक्के मतदान, गोव्यात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी प्रतिसाद

Subscribe

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022च्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. तसेच गोवा आणि उत्तराखंड मधील विधानसभेच्या जागांवर सोमवार मतदान झाले. गोव्यात 40 जागांवर निवडणूक घेण्यात आली होती. दिवसभर गोव्यात मतदानादरम्यान मोठा उत्साह दिसला आहे. गोव्यात दिवसभरात एकूण 78.9 टक्के मतदान झाले आहे. उत्तराखंडमध्ये 59.5 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच दुसर्‍या टप्प्यात यूपीमध्ये 61.8 टक्के मतदारांनी मतदान केलं आहे.

उत्तर प्रदेशात 9 जिल्ह्यांमध्ये 55 जागांवर सोमवारी 61.8 टक्के मतदान झाले. जे की 2017 च्या तुलनेत 3.9 टक्के कमी आहे. उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यायत २०१७ मध्ये 65.7 टक्के मतदान झाले होते. उत्तराखंडमध्ये यंदा 59.5 टक्के मतदान झाले होते जे की मागील निवडणुकीच्या तुलनेत 6.1 टक्क्यांनी कमी आहे. उत्तराखंडमध्ये 2017 च्या निवडणुकीत 65.6 टक्के मतदान झाले होते. गोव्यात 40 जागांवर 78.9 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जे की, मागील 2017 निवडणूकीच्या तुलनेत कमी आहे. गोव्यात 2017 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 82.56 टक्के मतदान झाले होते. यामध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि त्यांच्या पत्नीवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

- Advertisement -

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून सांगितले की ‘दंगा मुक्त आणि भय मुक्त नवीन उत्तर प्रदेश’ च्या विकासासाठी मतदान करा, भाजप यावेळी 300 जागांवर विजय मिळवेल असा विश्वास योगींनी व्यक्त केला आहे. गोवा निवडणुकीच्या 40 जागांसाठी एकूण 301 उमेदवार निवडणूकीसाठी मैदानात आहेत. गोवा येथे बहुचर्चित सामना पाहण्यासाठी मिळाला आहे. पूर्ण आम आदमी पार्टी (आप), तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि इतर छोटे प्रादेशिक पक्ष आहेत. गोव्यात 100 पेक्षा अधिक महिला मतदान केंद्र तयार करण्यासाठी राज्यामध्ये महिला मतांची सुविधा उपलब्ध आहे.

गोव्यात साखळी मतदारसंघात मतदारांचा चांगला प्रतिसाद

गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये 40 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली. गोव्यात 2017 मध्ये 83.56 टक्के मतदानाची नोंद झाली होती. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 78.9 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गोव्यात सर्वाधिक मतदान साखळी मतदारसंघात झाले आहे. साखळीत एकूण 89.64 टक्के मतदान करण्यात आले आहे. या मतदारसंघातून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत निवडणूक लढवत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : युवराजांसाठी 2014 मध्ये मला हेलिकॉप्टर उड्डाण करण्यापासून रोखण्यात आले, मोदींचा पंजाबमधून राहुल गांधींवर निशाणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -