Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर Assembly Battle 2022 Elections 2022 Voting Live: दुपारी ३ वाजेपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ४८.८१ टक्के मतदान,...

Elections 2022 Voting Live: दुपारी ३ वाजेपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ४८.८१ टक्के मतदान, तर पंजाबमध्ये ४९.८१ टक्के मतदान

Subscribe

दुपारी ३ वाजेपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ४८.८१ टक्के मतदान, तर पंजाबमध्ये ४९.८१ टक्के मतदान झाले.


- Advertisement -

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी मतदान केले


- Advertisement -

दुपारी १ वाजेपर्यंत पंजाबमध्ये ३४.१० टक्के मतदान, तर उत्तर प्रदेशमध्ये ३५.८८ टक्के मतदान झाले.


उत्तर प्रदेश फर्रूखाबाद जिल्ह्यातील विधानसभा १९४ बूथ नंबर ३८ वरील ईव्हीएममध्ये सायकलचे चिन्ह नसल्याचे समाजवादी पार्टीचे ट्वीट करून सांगितले आहे.


पटियाला जिंकण्याची मला खात्री आहे. मला वाटते की, आम्ही निवडणूक जिंकू, अशी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली.


सकाळी ११ वाजेपर्यंत पंजाबमध्ये १७.७७ टक्के मतदान, उत्तरप्रदेशमध्ये २१.१८ मतदान झाले.


सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मतदान केले


पंजाबचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांनी मतदान केले.


सकाळी ९ वाजेपर्यंत पंजाबमध्ये ४.८० मतदान झाले असून उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात ८.१५ टक्के मतदान झाले आहेत.


काँग्रेसचे खासदार प्रताप सिंह बाजवा यांनी मतदान केले


अभिनेता सोनू सूदची बहिण आणि मोगामधील काँग्रेसच्या उमेदवार मालविका सूद यांनी येथील शासकीय मुलींच्या विद्यालयात मतदान केले.


पंजाबचे मंत्री भारत भूषण आशु यांनी लुधियाना येथे मतदान केले


पीएसपीचे नेते शिवपाल सिंह यादव यांनी आज सकाळी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची त्यांच्या इटावा येथील निवासस्थानी भेट घेतली.


पंजाबमध्ये २३ जिल्ह्यातील सर्व ११७ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. मतदान सुरू होण्यापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी शिव मंदिरात पूजा-अर्चा केली. तसेच त्यापूर्वी कटलगढ साहिब गुरुद्वारमध्ये चन्नी यांनी दर्शन घेतले.


तसेच आज उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात ५९ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे.


काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि त्यांची पत्नी आणि फारुखाबाद सदरमधील पक्षाचे उमेदवार लुईस खुर्शीद यांनी मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदान केले.

- Advertisment -