घरट्रेंडिंगकाँग्रेसच्या रॅलीमध्ये राहुल गांधींचा मुलगा! पाहा व्हिडिओ!

काँग्रेसच्या रॅलीमध्ये राहुल गांधींचा मुलगा! पाहा व्हिडिओ!

Subscribe

काँग्रेस पक्षाकडून मध्य प्रदेशमध्ये जोरदार प्रचार सध्या केला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी स्वत: पक्षाध्यक्ष राहुल गांधी कंबर कसून प्रचाराला लागले आहेत. मात्र, यादरम्यान त्यांच्याच पक्षाचे नेते पुरेशा अभ्यासाअभावी पक्षाचं आणि पर्यायाने राहुल गांधींचंही हसं करून घेत आहेत.

देशात सध्या ५ राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा आहे. त्यातही मध्य प्रदेशमध्ये निवडणुकांचा ज्वर चांगलाच चढायला लागला आहे. या निवडणुकांसाठीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मागच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये मध्य प्रदेशमध्ये संकल्प रॅली काढली होती. त्यादरम्यान राहुल गांधींच्या मध्य प्रदेशमध्ये विविध भागांमध्ये प्रचार सभा देखील झाल्या. या प्रचार सभांमध्ये एकीकडे राहुल गांधी पोट तिडकीने काँग्रेससाठी मतं मागत होते. मात्र दुसरीकडे, त्यांच्याच पक्षाचे स्थानिक नेते पक्षाची इभ्रतच जाहीर सभेमध्ये आणि तेही राहुल गांधींच्या समोर काढत होते. त्यामुळे अशा वेळी स्टेजवर बसलेल्या राहुल गांधींना हसावं की रडावं? असाच प्रश्न पडला असावा. यातल्या एका महाशयांनी राहुल गांधींच्या समोरच ‘राहुल गांधीजी को किन्होने मारा, ये आप सब जानते है’ असं म्हणून स्वत:चा आणि पक्षाचा हशा करून घेतला, तर दुसऱ्या महाशयांनी थेट राहुल गांधींच्या मुलालाच सभेमध्ये उपस्थित करून घेतलं! या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत!

‘राहुल गांधीजीको किन्होने मारा, सब जानते है’

यातली पहिली घटना मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये संकल्प रॅलीदरम्यान झालेल्या राहुल गांधींच्या सभेमधली आहे. या रॅलीमध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते चक्क राहुल गांधींना त्यांच्या हयातीतच मृत घोषित करून मोकळे झाले. आणि तेही त्यांच्याच उपस्थितीत. ‘आदरणीय इंदिराजी को किन्होने मारा ये आप सब जानते है’, असं आधी हा नेता म्हणाला. पण त्याच्याच पुढे बोलण्याच्या ओघात हा नेता म्हणाला की ‘आदरणीय राहुल गांधीजी को किन्होने मारा ये आप सब जानते है’. वास्तविक या नेत्याला म्हणायचं होतं राजीव गांधी, पण तो म्हणाला राहुल गांधी आणि त्यामुळे भर सभेमध्ये त्याचंही आणि राहुल गांधींचंही हसं झालं!

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधानपदासाठी कुणाला पसंती, राहुल गांधी की नरेंद्र मोदी?

‘राहुल गांधीजी का बेटा आज हमारे बीच में’

एकीकडे काँग्रेसच्या एका नेत्याने राहुल गांधींना जिवंतपणीच मृत घोषित केलेलं असतानाच दुसरीकडे आणखी एका काँग्रेस नेत्याने काँग्रेसच्याच रॅलीमध्ये अद्याप ब्रह्मचारी राहुल गांधींच्या मुलाचा शोध लावला. ‘राहुल गांधी जी का बेटा आज हमारे बीच में है’, असं हा नेता म्हणाला. नंतर स्टेजवरच्याच काही मान्यवरांनी त्यांच्या लक्षात त्यांची चूक आणून दिल्यानंतर मात्र त्यांनी चूक सुधारत पुन्हा राजीव गांधीजी का बेटा असं म्हटल्यामुळे पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये हशा पिकला.

काँग्रेसच्या संकल्प रॅलीमध्ये राहुल गांधींचा मुलगा! पाहा व्हिडिओ!

काँग्रेसच्या संकल्प रॅलीमध्ये राहुल गांधींचा मुलगा! पाहा व्हिडिओ! | #MyMahanagar

Posted by My Mahanagar on Friday, 16 November 2018

- Advertisement -

 

एकीकडे काँग्रेस पक्ष मध्य प्रदेशमध्ये सत्ता मिळवण्याची स्वप्न पाहात असताना काँग्रेस नेत्यांच्या या पराक्रमामुळे भाजपच्या हातात काँग्रेसची खिल्ली उडवण्याची आयतीच संधी चालून आली आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – सुप्रीम कोर्टात मोदींकडून चोरीची कबुली – राहुल गांधी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -