Assembly election : ‘या’ निवडणुकीत भाजप-आरपीआय युतीला बहुमत मिळणार, रामदास आठवलेंचं वक्तव्य

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला ईशान्य भारतात जनतेचा जनाधार लाभत आहे. मणिपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढली असून मणिपूर विधानसभेच्या 20 जागांवर रिपब्लिकन पक्ष निर्णायक लढत देऊ शकतो.

देशात आगामी 5 राज्यांमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या निवडणुका होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडून कधीही निवडणुकांची घोषणा करण्यात येऊ शकते. पण मणिपूरमध्ये विधनसभा निवडणुकीमध्ये भाजप आरपीआय युतीच्या 40 पेक्षा अधिक जागा निवडून येतील आणि बहुमत मिळेल असा विश्वास रिपल्बिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

मणिपूर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आरपीआय आणि भाजपकडून जोरदार तयारी सुरु केली आहे. इंफाळच्या केशमथांग विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाच्या जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी आयोजक रिपाइंचे मणिपूर राज्य अध्यक्ष महेश थनांजम आणि रिपाइंचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे यावेळी उपस्थित होते. ईशान्य भारतातील सर्व राज्यांना देशाच्या मुख्यप्रवहात आणण्यासाठी ईशान्य भारताच्या सर्व स्तरांवरील विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार कार्यरत आहे. मणिपूरच्या विकासासाठी सामाजिक न्याय मंत्रालय आणि केंद्र सरकारचे सर्व मंत्रालय विभाग कटिबद्ध असल्याचे रामदास आठवल म्हणाले.

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला ईशान्य भारतात जनतेचा जनाधार लाभत आहे. मणिपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढली असून मणिपूर विधानसभेच्या 20 जागांवर रिपब्लिकन पक्ष निर्णायक लढत देऊ शकतो.मात्र भाजप सोबत रिपब्लिकन पक्षा ची युती होणार असून भाजप सोबतच्या युती मध्ये रिपब्लिकन पक्षाला 2 जागा देण्यात याव्यात असा प्रस्ताव भाजपला देण्यात आला आहे. भाजप आरपीआयची युती झाल्यास या युतीच्या 40 जागा निवडून येतील असा विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

देशातील ५ राज्यांत निवडणुका

देशात फेब्रुवारी २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या 5 राज्यांत विधानसभा निवडणुक होत आहे. या पार्श्वभूमीवर मणिपूर विधानसभा आणि ईशान्य भारतातील अन्य 5 राज्यांत निवडणूक आयोगाने रिपब्लिकन पक्षाला हेल्मेट चिन्ह दिले आहे. तर या चिन्हावर रामदास आठवले म्हणाले की, हेल्मेट हे सुरक्षेचे चिन्ह आहे.


हेही वाचा : PM Modi Security Breach: भाजप समर्थकांनी मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला?, नवाब मलिकांचा भाजपला सवाल