घरAssembly Session LiveAssembly Election Result : चार राज्यांच्या निकालावर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात...; 'मन...

Assembly Election Result : चार राज्यांच्या निकालावर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात…; ‘मन मन मोदी’

Subscribe

मुंबई : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील 675 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आज (3 डिसेंबर) चार राज्यांतील 635 जागांवर मतमोजणी होत आहे. यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपाचे सरकार येणार हे जवळपास निश्चित आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, आतापर्यंत लोक म्हणतं होते की, घर घर मोदी, पण आता ‘मन मन मोदी’ अशाप्रकारचा निकाल चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळत आहे. (Assembly Election Result Chief Minister Eknath Shinde says on the results of four states Man Man Modi)

हेही वाचा – Assembly Election Result : …देशातली जनता काँग्रेसला हद्दपार करेल; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

- Advertisement -

एकनाथ शिंदे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, देशासाठी केलेलं काम आणि गृहमंत्री अमित शहा याचं नियोजन या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला प्रचंड विजय आणि यश देऊन गेलं. आतापर्यंत लोक म्हणतं होते की, घर घर मोदी, आता या निवडणुकांमध्ये मन मन मोदी अशाप्रकारचं एक निकाल या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिला. अनेक लोकं म्हणतं होते की, मोदींचा करिश्मा संपला, या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी पराभूत होईल आणि खूप मोठं बदनामीचं छडयंत्र आणि आरोप-प्रत्यारोप या निवडणुकांमध्ये विरोधकांनी केले. परंतु शेवटी हे निकाल जनतेच्या हातामध्ये असतात, जनता जनार्दन हे सर्वस्वी असतं आणि या जनतेने या निवडणुकांमध्ये मोदींना साथ दिली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा – CM Of MP : शिवराजसिंह चौहान यांच्यासोबतच ‘हे’ नेतेसुद्धा CM पदाचे उमेदवार; माळ नेमकी कुणाच्या गळात?

- Advertisement -

आपल्या देशाचं जे काही कर्तत्व आहे, एका मोठ्या उंचीवर नेण्याचं काम मोदींनी केलं. या देशाचं नाव जगभरामध्ये रोषण करण्याचं काम मोदींनी केलं. त्यामुळे या तीन राज्यांमध्ये मोठ्या फरकाने भारतीय जनता पक्ष आणि एनडीए यांना विजय मिळाला आहे. खरं म्हणजे मोदींचा करिश्मा, मोदींबद्दल लोकांच्या मनामध्ये असलेली लोकप्रियता आणि आज मोदी देशात नाहीतर जगामध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. नंबर एकला आहेत, हे पुन्हा एकदा या निवडणुकांनी सिद्ध करून दाखवलं आहे, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -