घरताज्या घडामोडीAssembly Elections 2021: पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, २ मेला निकाल

Assembly Elections 2021: पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, २ मेला निकाल

Subscribe

देशातील चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. आसाममध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान २७ मार्चला होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे १ एप्रिल आणि ६ एप्रिलला होणार आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये ६ एप्रिलला सगळ्या जागांसाठी मतदान होणार आहे. केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीत ६ एप्रिलला मतदान होणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांत मतदान होणार आहे. २७ मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दुसरा टप्पा १ एप्रिलला, ६ एप्रिलला तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. १० एप्रिलला चौथ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. १७ एप्रिलला पाचव्या टप्प्याचं, २२ एप्रिलला सहाव्या टप्प्यातील, २६ एप्रिलला सातव्या टप्प्यातील आणि आठव्या टप्प्यातील मतदान हे २९ एप्रिलला होणार आहे. २ मे ला सर्व राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. कोरोनाच्या काळात बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचं लसीकरण केलं जाणा आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली.

आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान

  • पहिला टप्पा – २७ मार्चला मतदान
  • दुसरा टप्पा – १ एप्रिलला मतदान
  • तिसरा टप्पा – ६ एप्रिलला

केरळमध्ये पहिल्या टप्प्यात ६ एप्रिलला मतदान होणार

- Advertisement -

तामिळनाडूमध्ये पहिल्या टप्प्यात ६ एप्रिलला मतदान होणार

केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीत ६ एप्रिलला मतदान होणार

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांत मतदान होणार

  • पहिला टप्पा – २७ मार्चला मतदान
  • दुसरा टप्पा – १ एप्रिलला मतदान
  • तिसरा टप्पा – ६ एप्रिलला मतदान
  • चौथा टप्पा – १० एप्रिलला मतदान
  • पाचवा टप्पा – १७ एप्रिलला मतदान
  • सहावा टप्पा – २२ एप्रिलला मतदान
  • सातवा टप्पा – २६ एप्रिलला मतदान
  • आठवा टप्पा – २९ एप्रिलला मतदान

देशातील चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशामध्ये निवडणूक होणार आहे. एकूण ८२४ विधानसभा जागांवर निवडणुका होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा जागांवर निवडणूक होणार आहे. तामिळनाडू मध्ये २३४ जागांवर निवडणूक होणार आहे. केरळमध्ये १४० जागांवर, आसाममध्ये १२६ जागांवर आणि पुदुच्चेरीमध्ये ३० जागांवर निवडणूक होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवार प्रचार करणार. मात्र, कोरोनामुळे उमेदवारासह ५ जणांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. उमेदावाराला नामांकनासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाची वेळा १ तासाने वाढवण्यात आली आहे, अशी माहिती सुनिल अरोरा यांनी दिली. याशिवाय, प्रचारासाठी मैदानं निश्चित केली जाणार आहेत. राजकीय पक्षांना उमेदवाराबद्दल त्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डची स्थानिक वृत्तपत्र, चॅनेल आणि वेबसाइटवर माहिती द्यावी लागेल.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालसह सर्व राज्यांमध्ये सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात केली जाणार आहे. यावेळी केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये १ लाख १ हजार ९१६ मतदान केंद्र असणार आहेत. केरळमध्ये ४० हजार ७७१, पुदुच्चेरीमध्ये १ हजार ५५९ तर आसाममध्ये ३३ हजार मतदान केंद्र असणार आहेत. १८.६८ कोटी मदतार मतदान करणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -