Eco friendly bappa Competition
घर CORONA UPDATE Corona: भारतात तयार होणार कोरोनाची लस; पुण्यातील कंपनीशी केला करार

Corona: भारतात तयार होणार कोरोनाची लस; पुण्यातील कंपनीशी केला करार

Subscribe

कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूवर लस बनवण्यासाठी सर्व देशातील वैज्ञानिक विविध संशोधन करत आहेत. यामध्ये अमेरिका, चीन, ब्रिटन, जर्मनी इत्यादींसह भारताचाही समावेश आहे. या लसीच्या यशाबद्दल भारताकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. लस बनवण्याच्या संदर्भात होणाऱ्या चाचणी दरम्यान भारतात त्याच्या उत्पादनाची तयारी सुरू झाली आहे. पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) च्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना विषाणूच्या लसीचे उत्पादन करणे तसेच पुरवठा करण्याची तयारी करण्यात आली आहे.

हेही वाचा – याला म्हणतात डोकॅलिटी! लॉकडाऊनमध्ये लग्नासाठी शोधली भन्नाट पळवाट!

भारतासह इतर देशांनाही पुरवणार लस 

- Advertisement -

ब्रिटनमधील ब्रिटीश – स्वीडिश फार्मा कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेकाने AZD1222 ही लस पुरवण्यासाठी भारताशी हातमळवणी केली असल्याचे जाहीर केले आहे. तसेच एसआयआय (SII) सोबत परवाना करारदेखील केला आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने कोरोनाची आपली संभाव्य लस पुरवण्याची जबाबदारी अ‍ॅस्ट्रॅजेनेका कंपनीला दिली आहे. अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि एसआयआय एकत्र मिळून १०० कोटी इतक्या लस तयार करण्याच्या तयारीत आहेत. पुण्यातील कंपनीत या लसीचे उत्पादन होणार असून भारतासह कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ती लस पुरवली जाणार आहे. कोरोना लस बनवण्याच्या शर्यतीत ऑक्सफोर्ड विद्यापीठ आघाडीवर असून लसीची चाचणी दुसर्‍या टप्प्यात पोहोचली आहे.

एसआयआय सध्या यूकेच्या ऑक्सफोर्ड, अमेरिकेच्या कोडेजेनिक्स आणि ऑस्ट्रेलियाच्या बायोटेक फार्म थेमिस यांनी विकसित केलेल्या व्हॅक्सिन कँडिडेट्सवर काम करत आहे. पण पूनावाल्यास ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत कारण ही लस चाचणीत सर्वात पुढे आहे. याव्यतिरिक्त एसआयआय देखील स्वतःची लस विकसित करत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -