घरदेश-विदेशकॅप्सूलमधील त्रुटीनंतरही अंतराळवीर पोहोचले स्पेस स्थानकात, प्रक्षेपित झाली होती स्पेस-एक्सची मोहिम

कॅप्सूलमधील त्रुटीनंतरही अंतराळवीर पोहोचले स्पेस स्थानकात, प्रक्षेपित झाली होती स्पेस-एक्सची मोहिम

Subscribe

नवी दिल्ली : स्पेस-एक्स मोहिमेतील क्रू-६ मिशनचे काल, गुरुवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते, पण त्यानंतर तांत्रिक बिघाडमुळे स्पेस-एक्सच्या कॅप्सूलला स्पेस स्थानकाच्या परिभ्रमण प्रयोगशाळेपासून तब्बल ६५ फूट अंतरावर थांबावे लागले होते. मात्र, प्रक्षेपणानंतर २५ तासांनी अंतराळवीरांनी आज पहाटे १:४० वा. अंतराळ स्थानकात प्रवेश केला. एलोन मस्कचे स्पेस-एक्स हे सहावे ऑपरेशन क्रू फ्लाईट आहे. यामध्ये नासाचे 2, रशियाचे 1 आणि युएईमधील एका अंतराळवीराचा समावेश आहे.

अंतराळवीरांच्या कॅप्सूलला स्पेस स्थानकाशी जोडण्यासाठी १२ हूक जोडावे लागतात, पण एक जरी हूक खराब असेल तर त्यांना अंतराळ स्थानकाशी संपर्क साधता येत नाही आणि असेच स्पेस-एक्सच्या क्रू-६ च्या अंतराळवीरांसोबत घडले. कॅप्सूलच्या एका हूकवरील स्विच खराब झाले होते. त्यानंतर लगेचच त्या स्विचला दुरुस्त करण्यात आले. स्विच खराब झाल्याची माहिती मिळताच स्पेस-एक्सने क्रू-६ च्या अंतराळवीरांना धीर धरण्याचे आवाहन केले. तसेच त्यांना सांगण्यात आले की, ते अस्वस्थ न होता या स्थितीत २ तास राहू शकतात.

- Advertisement -

स्पेस-एक्सच्या फाल्कन-९ रॉकेटने (ड्रॅगन एंडेव्हर) ४ क्रू अंसराळवीरांसोबत अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर क्रमांक ३९ ए येथून गुरुवारी रात्री १:४५ वाजता (भारतीय वेळेनुसार गुरुवारी दुपारी १२.१५ वाजता) उड्डाण केले होते. अंतराळयान स्पेस स्थानकासह जोडल्यानंतर अंतराळवीर त्यांच्या कॅप्सूलमधून बाहेर आले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आधीच उपस्थित असलेल्या अंतराळवीरांनी त्यांना मिठी मारून आणि फोटो काढून त्यांचे स्वागत केले. स्पेस-एक्सने याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अंतराळवीर एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

- Advertisement -

६ महिने करणार संशोधन
अंतराळवीरांचा  ४ जणांचा ग्रुप 6 महिने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहणार आहे. हे ४ अंतराळवीर अवकाश स्थानकात हृदयाच्या स्नायूंच्या ऊतींची चाचणी घेतील. एक बायोप्रिंटर मानवी पेशी आणि ऊतक मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये मुद्रित करण्यास सक्षम आहे. यासोबतच ते औषध निर्मिती तंत्रज्ञानावरही संशोधन करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -