साऊथ आफ्रिकेतील एका बारमध्ये गोळीबार, १४ जणांचा मृत्यू

याच संदर्भांत पोलीस अधिकारी इलियास मावेला यांनी माहिती दिली, की ही गोळीबाराची दुर्दैवी घटना काल रात्री १२. ३० च्या सुमारास घडली.

साऊथ आफ्रीकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. साऊथ आफ्रीकेतील सोवेटा टाऊनशिप मधील जोहान्सबर्ग जवळील भागात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये १४ लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याच संदर्भांत पोलीस अधिकारी इलियास मावेला यांनी माहिती दिली, की ही गोळीबाराची दुर्दैवी घटना काल रात्री १२. ३० च्या सुमारास घडली.

हे ही वाचा –  गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्री कामत यांच्यासह अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश…

१२ लोकांचा मृत्यू

या घटनेसंदर्भात पोलीस अधिकारी इलियास मावेला यांनी सविस्तर माहिती दिली तेव्हा ते म्हणाले, की जेव्हा आम्ही घटना स्थळी पोहोचलो तेव्हा तिथल्या एकूणच सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. तेव्हा या गोळीबारामध्ये १२ लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर ११ लोक गंभीर जखमी झाले आहेत. पण त्या नंतर त्यातीलही २ जणांचा मृत्यू झाला आणि गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १४ झाली.

हे ही वाचा – पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण; ५९ जणांचा मृत्यू

हल्लेखोर हल्ला करून फरार

ज्या बार मध्ये गोळीबार झाला तो भाग जोहान्सबर्ग येथील जास्त लोकसंख्या असलेला भाग आहे. हल्लेखोरांनी रात्री या बार मध्ये घुसून हल्ला केला आणि अंधाधुंद गोळीबार केला आणि त्या नंतर हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींवर सध्या उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा – मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, राज्याच्या विकासाला केंद्राचे सहकार्य

पोलिसांकडून चौकशी

पोलीस अधिकारी इलियास मावेला यांनी सांगितले, की जेव्हा त्या बार मध्ये प्रत्येक जण एन्जॉय करत असतानाच या बार मध्ये हल्लेखोर घुसले आणि आणि त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. या सगळ्या घटनेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या भागात पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवला आहे.

हे ही वाचा – श्रीलंकेत आंदोलकांचा राष्ट्रपती भवनात धुडगूस, गोतबायांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी