घरदेश-विदेशइजिप्तमध्ये चर्चला आग; चेंगराचेंगरीत 35 लहान मुलांसह 41 जणांचा मृत्यू

इजिप्तमध्ये चर्चला आग; चेंगराचेंगरीत 35 लहान मुलांसह 41 जणांचा मृत्यू

Subscribe

चर्चला आग लागल्यामुळे चेंगराचेंगरीत 41 जणांचा मृत्यू झाला. मृतामध्ये 35 लहान मुलांचा समावेश आहे.

कैरौ – इजिप्त देशातील गिझा शहरात एका चर्चला आग लागली. या आगीत 41 जणांचा मृत्यू झाला. या आगीत मृत्यू झालेल्यांमध्ये 35 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी 5 हजार लोक उपस्थित होते.

इजिप्तची राजधानी कैरौमधील गिझा येथील चर्चमध्ये 5 हजार लोक प्रार्थनेसाठी जमले होते. नेमके त्याचवेळी चर्चला आग लागली. यामुळे लोक सैरावैरा पळू लागले. यामुळे चर्चमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 41 जणांचा मृत्यू झाल आहे. यात लहान मुले, चर्चमधील धर्मगुरु आणि नागरिकांचा समावेश आहे. या घटनेतील जखमींची संख्या समोर आलेली नाही. चर्चचे आगीत मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

शॉर्ट सर्किटमुळे आग –

या चर्चचे नाव अबू सेफिन असे असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. चर्चची इमारत जूनी होती. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. आग लागल्याने चर्चमधील नागरिकांनी पळापळ सुरू केली आणि यामुळे चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत गुदमरुन अनेकांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

५५ जण जखमी –

चर्चमध्ये लागलेल्या आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही घटना आज सकाळी घडली असून अग्निशमन दलाच्या १५ गाड्यांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचा प्रयत्न केला. जखमींना आणि मृत व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इजिप्तच्या आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार ५५ जण जखमी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते होसाम अब्देल गफर यांनी याबाबत माहिती दिली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -