घरदेश-विदेशवाजपेयींविषयी सर्वकाही, एका क्लिकवर

वाजपेयींविषयी सर्वकाही, एका क्लिकवर

Subscribe

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं दिल्लीमध्ये निधन झालं. आढवा घेऊया, त्यांच्या राजकीय आयुष्यातील महत्वाच्या घडमोडींचा...

  • अटलबिहारी वाजपेयी हे सर्वाधिक काळ हयात असलेले माजी भारतीय पंतप्रधान होते

  • एक उत्तम कवी, पत्रकार, प्रक्वते म्हणूनही लोकप्रिय. देशभरात त्यांचं काव्य प्रसिद्ध आहे.

  • ‘पद्मविभूषण’ आणि ‘भारतरत्न’ या पुरस्कारांनी वाजपेयी सन्मानित

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रति (RSS) वाजपेयींची निस्सिम श्रद्धा होती

atal bihari vajpayee
  • १९५५ साली लढवलेली पहिली निवडणूक अटलजी हरले होते. त्यानंतर ते १९५७ मध्ये त्यांनी बलरामपूर आणि लखनऊमधूनक लढवली मात्र तीही निवडणूक ते हरले.

  • मात्र, त्यानंतर बलरामपुर इथे झालेल्या निवडणुकीत ते जिंकले आणि पहिल्यांदा खासदार बनले.

  • ‘पत्रकारितेमध्येच पुढे करिअर करायचं होतं पण चुकून राजकारणात आलो’, असं वाजपेयी एका मुलाखतीत म्हणाले होते.

atal bihari vajpayee

  • पंडित जवाहरलाल नेहरु यांना वाजपेयींच्या भाषण कौशल्याचं कायम अप्रूप होतं. वाजपेयी एक दिवस देशाचे पंतप्रधान बनणार, अशी खात्री नेहरुंना होती

  • १९४२ मध्ये भारत छोडो चळवळीच्या दरम्यान वाजपेयींनी २३ दिवसांचा कारावास भोगला होता

  • १९६८ मध्ये दीनदयाल उपाध्याय यांच्या निधनानंतर अटलजी भारतीय जन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. १९७७ साली जन संघाचे नाव बदलून भारतीय जनता पार्टी करण्यात आले

atal bihari vajpayee

- Advertisement -
  • १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताचा विजय झाला. या विजयानंतर लोक वाजपेयींना एक प्रभावी नेता आणि वाजपेयी सरकारला शक्तीशाली सरकार समजू लागले

  • २००१ मध्ये वाजपेयींनी ‘सर्व शिक्षा अभियाना’ची सुरुवात केली

  • २००२ सालच्या गुजरात दंगलीदरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता.

atal bihari vajpayee

  • दिल्ली – लाहोर बससेवा वाजपेयींनी सुरु केली होती

  • अन्य पक्षांचे वरिष्ठ नेते वाजपेयींना खूप मानायचे. वेळोवेळी ते वाजपेयींकडून राजकीय सल्ले घेत असत

  • संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेमध्ये ‘हिंदी’ भाषेत बोलणारे वाजपयी पहिले परराष्ट्रमंत्री होते

atal bihari vajpayee

वाचा ः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी कालवश

वाचा ः कवी मनाचा राजकारणी, अटल बिहारी वाजपेयी!

वाचा ः वाजपेयी यांच्या नजरेतून सुधीर फडके आणि गदिमा यांचे ‘गीतरामायण’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -