घरदेश-विदेशAPY Scheme : वय वर्ष ४० आधी करा हे काम, ५००० रुपये...

APY Scheme : वय वर्ष ४० आधी करा हे काम, ५००० रुपये महिना पेंशनची गॅरंटी; १.९ कोटी भारतीयांनी केली नोंदणी

Subscribe

 

नवी दिल्लीः २०२२-२३ या आर्थिक वर्षात अटल पेन्शन योजनेसाठी १.९ कोटी भारतीयांनी नोंदणी केली आहे. या योजनेच्या नोंदणीत गेल्या काही दिवसांत वाढ होते आहे. तसेच राष्ट्रीय पेन्शनचीही नोंदणी वाढली आहे. येत्या काही दिवसांत याची नोंदणी अजून वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

12 ऑक्टोबर 2021 पर्यंत 3 कोटी 90 लाख जणांनी या योजनेसाठी नोंदणी केली. त्यानंतर मार्च 2022 पर्यंत ९९ लाख जणांनी योजनेसाठी नोंदणी केली. गेल्या आर्थिक वर्षात १.९ कोटी भारतीयांनी यामध्ये नोंदणी केली आहे. ही योजना लोकप्रिय होत असून नोंदणी संख्येने जवळपास पाच कोटीचा टप्पा केला आहे.

२०१५ साली ही योजना लागू करण्यात आली.18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकते. 18 वर्षे वयाच्या व्यक्तीने दरमहा 42 रुपये गुंतवल्यास वयाच्या 60 व्या वर्षी त्याला दरमहा 1,000 रुपये पेन्शन मिळेल. वयाच्या 18 व्या वर्षी प्रत्येक महिन्याला 210 रुपये पेन्शन जमा केल्यावर निवृत्तीनंतर 5000 रुपये मासिक पेन्शन मिळते. वयानुसार प्रीमियमची रक्कम वाढते. वयाच्या 40 व्या वर्षी जर एखाद्याला अटल पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला दरमहा 1 हजार रुपये पेन्शनसाठी 291 रुपये दरमहा जमा करावे लागतील, तर 5 हजार रुपये दरमहा पेन्शनसाठी 1,454 रुपये जमा करावे लागतील.

- Advertisement -

अटल पेन्शन योजनेच्या प्रीमियमवर आयकर कलम 80CCD अंतर्गत कराचा लाभ उपलब्ध आहे. कलम 80CCD अंतर्गत कपातीची कमाल मर्यादा 2 लाख रुपये आहे. यामध्ये 50,000 रुपयांच्या अतिरिक्त कपातीचाही समावेश आहे.

12 ऑक्टोबर 2021 पर्यंत 3 कोटी 90 लाख लोक अटल पेन्शन योजनेत सामील झाले होते. या योजनेत या लोकांचे योगदान 16109 कोटी रुपये आहे. अटल पेन्शन योजना जवळपास प्रत्येक बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत नवीन पेन्शन योजना आणि अटल पेन्शन योजनेच्या ग्राहकांच्या संख्येत 23.7% वाढ झाली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये, 37.4 दशलक्ष लोक त्यांच्याशी जोडले गेले होते, जे 2021 मध्ये वाढून 46.3 दशलक्ष झाले. NPS अंतर्गत एकूण योगदान देखील एका वर्षात 29 टक्क्यांनी वाढले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -