घरताज्या घडामोडीकेंद्राचा मोठा निर्णय; अतिक-अशरफ हत्याकांडानंतर पत्रकारांच्या सुरक्षेसाठी SOP तयार होणार

केंद्राचा मोठा निर्णय; अतिक-अशरफ हत्याकांडानंतर पत्रकारांच्या सुरक्षेसाठी SOP तयार होणार

Subscribe

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची प्रसारमाध्यमांसमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन हल्लेखोरांनी दोघांवर अंदाधूंद गोळीबार केला. अचानक झालेल्या या गोळीबारात सुदैवाने इतर कोणालाही गोळी लागली नाही.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची प्रसारमाध्यमांसमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन हल्लेखोरांनी दोघांवर अंदाधूंद गोळीबार केला. अचानक झालेल्या या गोळीबारात सुदैवाने इतर कोणालाही गोळी लागली नाही. या घटनेनंतर केंद्र सरकारकडून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Atiq Ahmad Shot Dead SOP will be prepared for safety of journalists Center big decision after Atiq Ashraf death vvp96)

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालय (MHA) पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करणार असल्याचे समजते. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी या मार्गादर्शक सूचना आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – योगी सरकारच्या कायदा व्यवस्थेचा फोलपणा; एन्काऊंटर प्रकरणी सपा आणि एमआयएमची टीका

पत्रकार बनून आलेल्या तिघांनी अतिक आणि अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यांनी पोलिसांसमोर एका मागून एक गोळ्या चालवल्या. सुदैवाने इतर कोणालाही गोळी लागली नाही. या घटनेनंतर सरकार अलर्ट झाली आहे. तसेच, कॅमेऱ्यासमोरच दोन भावांची गोळ्या झाडून हत्या केल्याने उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

- Advertisement -

दरम्यान, यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले की, ही घटना पोलिसांच्या संरक्षणात घडली. यामुळे यूपीत गुन्हेगारांचे मनोबल उंचावले गेले आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी एकूण 18 राउंड गोळीबार केला. गोळी लागल्याने दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. प्रयागराजमधील रस्त्यांवर शांतता आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, दुकानेही बंद असून, प्रत्येक कारवाईवर पोलिसांची नजर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून पोलिसांना कडक देखरेखीच्या सूचना मिळाल्या आहेत.


हेही वाचा – अतिकच्या हत्येनंतर भाजप नेत्याचे ट्वीट चर्चेत; त्यांनी वर्तवलेली शक्यता…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -