घर देश-विदेश अतिकने बळकावलेली मालमत्ता पीडितांना परत देणार; योगी सरकारची मोठी घोषणा

अतिकने बळकावलेली मालमत्ता पीडितांना परत देणार; योगी सरकारची मोठी घोषणा

Subscribe

 

प्रयागराजः गोळीबारात ठार झालेल्या अतिक अहमदने धमकावून बळकावलेली मालमत्ता मूळ मालकांना परत करण्यासाठी आयोगाची स्थापना केली जाणार आहे.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याची घोषणा केली आहे.  अतिक अहमदच्या दहशतीमुळे जमीन किंवा घर गेलेल्या पीडितांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

प्रयागराजमधील झलवा येथे राहणाऱ्या जय श्री उर्फ सूरज कली यांची १२ बिघा जमीन अतिकने बळकावली होती. गेली ३५ वर्षे याचा खटला सुरु आहे. सरकारच्या निर्णयामुळे कली यांनी मुख्यमंत्री योगी यांचे आभार मानले आहेत. कली यांची ३ बिघा जमीन पीडीएमध्ये जमा झाली आहे. अन्य ९ बिघा जमीनवर गृहनिर्माण सोसायटी उभी राहणार आहे. त्यासाठी अतिकने ही जमीन शिवकोटी सहकारी आवास समिती तयार करुन विकली आहे. कली यांचे पती बृज मोहन उर्फ बच्चा कुशवाहा हेदेखील १९८९ मध्ये बेपत्ता झाले. त्यांचा अजून शोध लागलेला नाही. कली यांचा भाऊ प्रल्हाद यांचीही हत्या करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात अतिक अहमद आणि अशरफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रयागराज येथील कोल्विन रुग्णालयाजवळ ही घटना घडली. या दोघांना तेथे वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना अचानक पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार झाला. त्यात अतिक आणि अशरफचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला झाला तेव्हा जय श्री रामच्या घोषणा दिल्या जात असल्याचे बोलले जात आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

2006 मध्ये उमेश पाल यांचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्यामुळे माफिया अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्याविरुद्ध 2007 मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी या दोघांंना युपी एटीएसने अटक केली. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी कोल्विन रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यावेळी पोलिसांच्या ताफ्यावर अचानक गोळीबार झाला.  संपूर्ण मीडिया तेथे होता. त्यांच्यासमोर हा हल्ला झाला. त्यामुळे हा हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला. या हल्यात अतिक आणि अशरफचा मृत्यू झाला. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -