१ जानेवारीपासून ATM मधून पैसे काढल्यास ग्राहकांना बसणार मोठा फटका, RBIने जारी केली नियमावली

Sbi changed atm cash withdrawal rule otp based cash withdrawal from atm see full process
'या' बँकेचे ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले: जाणून घ्या नियम अन्यथा भरा पैसे

१ जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांना अधिक खर्च करावा लागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नवी नियमावली जारी केली आहे. १ जानेवारी २०२२ पासून एटीएम व्यवहारांवर शुल्क वाढवण्याची परवानगी दिली आहे. नव्या नियमांमुळे ग्राहकांना चांगलाच धक्का बसणार आहे. नव्या नियमांमुळे एटीएममधून पैसे काढणे किंवा इतर कोणतेही व्यवहार करणे आता महागात पडणार आहे. कारण १ जानेवारी २०२२ पासून मोफत मासिक मर्यादेनंतर बँकांना ATM व्यवहारांवर आकारण्यात येणारे शुल्क वाढवण्याची परवानगी आरबीआयने दिली आहे. एटीएममधील मोफत मर्यादेपेक्षा आर्थिक व्यवहार शुल्क २१ रूपये असेल. तर जे यापूर्वी २० रूपये होते. परंतु आता मोफत ट्रांजेक्शनपेक्षा जास्त पैसे काढले तर तुम्हाला प्रति ट्रांन्झेक्शन २० ऐवजी २१ रुपये खर्च करावे लागणार आहेत.
आरबीआयने परिपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.

बँक ग्राहकांना एटीएममधून ५ मोफत व्यवहार करता येणार आहेत. यामध्ये आर्थिक आणि गैर-आर्थिक अशा दोन्ही व्यवहारांचा समावेश असणार आहे. तसेच मेट्रो शहरांमध्ये राहणार बँकेचे ग्राहक आणि इतर बँकेच्या एटीएमधून तीन वेळा मोफत व्यवहार करण्याची संधी मिळू शकते. कोणताही कर लागू केल्यास या शुल्कापासून स्वतंत्रपणे तो आकरला जाणार आहे. ३१ डिसेंबर पर्यंत तुम्हाला २० रूपयांच्या शुल्काव्यतिरिक्त कर भरावा लागणार आहे. परंतु नवीन वर्षापासून ग्राहकांना २१ रूपये शुल्क व त्यावर कर लागू होणार असून तो भरावा लागणार आहे.

बँका ग्राहकांना एटीएममधून एकाच महिन्यात पाच मोफत व्यवहार देत आहेत. ग्राहकांचे काम ट्रांझेक्शन पुरता मर्यादित असते. ज्याबद्दल ग्राहकांना माहिती असणं आवश्यक आहे. बँकांना प्रत्येक व्यवहारासाठी इंटरचेंज शुल्क वाढवण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारांसाठी हे शुल्क १५ रूपयांवरून १७ रूपये इतके करण्यात आलं आहे. गैर प्रकाराच्या व्यवहारांसाठी इंटरचेंज फी ५ रूपयांवरून ६ रूपये करण्यात आली आहे. आरबीआयला मंजुरी मिळाल्यानंतर खाजगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांना माहिती देण्यास सुरूवात केली आहे. तसेच या संदर्भातील माहिती सुद्धा एसएमएसद्वारे पाठवली जात आहे.


हेही वाचा: India-Russia summit: भारत व रशिया दहशतवादाविरोधात एकत्र लढणार, व्लादिमीर पुतिन यांचा