घरअर्थजगतATM Transaction Fee Hike: ATM मधून पैसे काढण्याचे नियम १ जानेवारीपासून बदलणार,...

ATM Transaction Fee Hike: ATM मधून पैसे काढण्याचे नियम १ जानेवारीपासून बदलणार, एवढं शुल्क आकारणार

Subscribe

सध्या बँकेच्या एटीएम किंवा कॅश रिसायकल मशीनवरून एका महिन्यातील पहिले 5 आर्थिक व्यवहार आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी विनामूल्य आहेत. यानंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 20 रुपये शुल्क आकारले जाते. पण 1 जानेवारी 2022 पासून हे शुल्क प्रति आर्थिक व्यवहारासाठी 21 रुपये असेल. मेट्रो शहरांमधील इतर बँकेच्या एटीएममधून 3 व्यवहार आणि मेट्रो नसलेल्या शहरांमधील अन्य बँकेच्या एटीएममधून 5 व्यवहार विनामूल्य उपलब्ध राहतील.

नवी दिल्लीः ATM Transaction Fee Hike: नव्या वर्षात म्हणजे 1 जानेवारी 2022 पासून एटीएम किंवा कॅश रिसायक्लिअर मशीनमधून पैसे काढणं (Cash ATM Transaction) महागणार आहे. १ जानेवारीपासून ग्राहकांना नॉन-कॅश एटीएम व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतर आतापेक्षा जास्त शुल्क भरावे लागणार आहे. जून महिन्यातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) यावर शुल्क वाढवण्याची परवानगी दिली होती. एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेने पुन्हा एकदा त्यांच्या ग्राहकांना या नवीन नियमाची आठवण करून दिली.

सध्या बँकेच्या एटीएम किंवा कॅश रिसायकल मशीनवरून एका महिन्यातील पहिले 5 आर्थिक व्यवहार आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी विनामूल्य आहेत. यानंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 20 रुपये शुल्क आकारले जाते. पण 1 जानेवारी 2022 पासून हे शुल्क प्रति आर्थिक व्यवहारासाठी 21 रुपये असेल. मेट्रो शहरांमधील इतर बँकेच्या एटीएममधून 3 व्यवहार आणि मेट्रो नसलेल्या शहरांमधील अन्य बँकेच्या एटीएममधून 5 व्यवहार विनामूल्य उपलब्ध राहतील.

- Advertisement -

कर वेगळा आकारला जाणार

या व्यवहार शुल्कामध्ये GST समाविष्ट नाही. म्हणजेच या शुल्कावरही जीएसटी लागू होईल. गेल्या महिन्यापासून बँकांनी त्यांच्या ग्राहकांना याबाबतची माहिती पाठवण्यास सुरुवात केली. बँकांनीही यासंदर्भातील माहिती त्यांच्या वेबसाईटवर टाकली असून, मेसेजही पाठवले जात आहेत.

आर्थिक व्यवहार असो की गैर-आर्थिक व्यवहार

कोणत्याही बँकेच्या स्वतःच्या एटीएममधून सर्व गैर-आर्थिक व्यवहार विनामूल्य आहेत. जर एका बँकेच्या कार्डच्या साहाय्याने दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून गैर-आर्थिक व्यवहार केले जात असतील तर विनामूल्य व्यवहारांची संख्या पार केल्यानंतर शुल्क आकारले जाते. हे शुल्क बँकेनुसार बदलते. आर्थिक व्यवहारांमध्ये रोख पैसे काढणे समाविष्ट असते, तर गैर-आर्थिक व्यवहारांमध्ये शिल्लक चौकशी, मिनी स्टेटमेंट आणि पिन बदल यांचा समावेश होतो.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -