घरक्राइमTerror Attack : वांद्र्यातून लेडीज टेलरला ATS ने केली अटक

Terror Attack : वांद्र्यातून लेडीज टेलरला ATS ने केली अटक

Subscribe

देशात दहशतवादाशी कनेक्टेड सहा अतिरेक्यांना विविध भागातून अटक झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून देशभरात अटकेचे सत्र सुरू आहे. मुंबईतूनही दहशतवादाशी कनेक्टेड अशी तिसरी अटक आज गुरूवारी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून (Maharashtra ATS) करण्यात आली आहे. वांद्रे येथून इरफान शेख या संशयिताला अटक करण्यात आली आहे. इरफान शेख हा वांद्रे पूर्व येथील खेरवाडी येथे राहणारा आहे. दिल्लीत अटक करण्यात आलेल्या सहा अतिरेक्य़ांशी संबंधित प्रकरणात इरफान शेखला अटक करण्यात आली आहे. यापूर्वीच जोगेश्वरी येथून एटीएसने झाकीर शेखला, तर मुंब्रा येथून रिजवान मोमीनला अटक केली आहे. या प्रकरणातील मुंबईतून झालेली ही तिसरी अटक आहे.

मुंबईतील दहशतवादाचे पहिले कनेक्शन म्हणजे जान मोहम्मदला १८ सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. धारावीत राहणाऱ्या जान मोहम्मदला राजस्थानच्या कोटा येथून मुंबई निजामुद्दीन प्रवासादरम्यान अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठच मुंबईतून आणखी दोन जाणांना अटक करण्यात आली. मुंबईतून जोगेश्वरी आणि मुंबईतून दोघांना अटक करण्यात आली होती. तर आज वांद्रे येथून लेडीज टेलरला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित कनेक्शन आढळल्यानेच महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

अटक करण्यात आलेली व्यक्ती इरफान शेख असून ही व्यक्ती वांद्रे येथे राहणारी आहे. ही व्यक्ती लेडीज टेलर म्हणून या भागात काम करत होती. खेरवाडी येथे गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा स्वतःचा व्यवसाय होता असे कळते. मुंबईतील आतापर्यंत झालेल्या सर्व अटकेच्या मोहीमेत सर्वसामान्य अशा वस्तीतून झालेली ही अटक आहे. सलग तिसऱ्या अटकेमुळे मुंबईतील दहशतवाद्यांच्या कनेक्शन पुन्हा एकदा रडारवर आले आहे.


हेही वाचा – महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; जोगेश्वरीतून अजून एक संशयित दहशतवादी ताब्यात

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -