घरCORONA UPDATEदिल्लीत कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला

दिल्लीत कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला

Subscribe

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी झटत आहेत. दरम्यान, कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरच आता हल्ले होत आहेत. दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तैनात असलेल्या दोन महिला डॉक्टरांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. सफदरजंग रुग्णालय निवासी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनीष यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, सफदरजंग रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात तैनात असलेल्या दोन महिला डॉक्टरांवर गौतम बुद्ध नगरमध्ये त्यांच्या शेजार्‍यांनी हल्ला केला. बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही महिला डॉक्टर फळ खरेदीसाठी घराबाहेर आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.


हेही वाचा – ‘या’ देशात कोरोनाचं औषध म्हणून प्यायले विषारी मद्य; ६०० मृत्यू, ३००० आजारी

- Advertisement -

डॉ. मनीष यांनी सांगितलं की, शेजारची एक महिला डॉक्टरांवर जोरात ओरडू लागली की त्या इथे कोरोना विषाणूचा प्रसार करीत आहे. जेव्हा महिला डॉक्टरांनी यावर प्रतिक्रिया दिली तेव्हा शेजार्‍यांनी त्यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी हौजखास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने कोरोनाविरूद्ध लढणाऱ्यांना लक्ष्य करू नये, असा आदेश जारी केला आहे. आरोग्य मंत्रालयाने कोविड-१९ संबंधित सामाजिक भेदभावाकडे लक्ष देत हा आदेश जारी केला आहे. यामध्ये कोरोना विषाणूमुळे कोणालाही दोषी ठरवू नका. तसंच त्याबद्दल कोणावरही आरोप ठेवू नका. आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असं देखील म्हटलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -