तबलीगींचा शोध घेणाऱ्या पोलीस पथकावर हल्ला

दिल्लीतील निजामुद्दीन य़ेथे तबलीगी जमात मरकजमध्ये सामील झालेल्यांचा देशभरात शोध घेण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील बरेली गावात गेलेल्या पोलिसांच्या पथकावर स्थानिक मुस्लीम नागरिकांनी हल्ला केला. यात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

मरकजला गेलेले काही तबलीगी नागरिक येथील चौधारी गावात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे पथक गावात दाखल झाले व त्यांनी तबलीगींना पकडले. हे कळताच सगळा गाव शेकडोंच्या संख्येने पोलिसांवर धावून गेला. हातात मिळेल त्या वस्तूने सगळेजण पोलिसांना मारहाण करत होते. जमावाच्या तुलनेने पोलिसांची संख्या कमी असल्याने जमाव अधिकच आक्रमक झाला होता. यात आयपीएस अधिकारी अभिषेक वर्मा जखमी झाले. त्यानंतर जमावाने आपला मोर्चा पोलीस चौकीकडे वळवला व चौकीची तोडफोड केली. नंतर काही वेळाने पोलिसांची दुसरी कुमक घटनास्थळी आली व त्यांनी जमावाच्या तावडीतून पोलिसांची सुटका केली.