घरदेश-विदेशपॅरिसमधील भारताच्या राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

पॅरिसमधील भारताच्या राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

Subscribe

पॅरिसमध्ये भारताच्या राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न रविवारी करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये भारताच्या राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राफेल डीलचा आढावा घेण्यासाठी फ्रान्सला गेलेल्या भारतीय हवाई दलाच्या राफेल प्रकल्पाच्या व्यवस्थापन पथकाच्या कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅरिसबाहेर रविवारी ही घटना घडली असून या घटनेची माहिती हवाई दलाकडून संरक्षण मंत्रालयाला देण्यात आली आहे.

- Advertisement -

भारतीय हवाई दलाच्या राफेल प्रकल्पाच्या व्यवस्थापन पथकाचे कार्यालय पॅरिसबाहेरील उपनगरात आहे. भारतीय हवाई दलाच्या राफेल डीलबद्दलच्या आढावा पथकाच्या कार्यालयात काही अज्ञात व्यक्तींनी घुसखोरीचा रविवारी प्रयत्न केला होता. या अज्ञातांचा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती चोरण्याच्या उद्देश असल्याचे समोर आले आहे. मात्र, या कार्यालयातून कोणतीही कागदपत्रे किंवा हार्ड डिस्क चोरीला गेली नाही. याबद्दलची अधिक माहिती अद्यप मिळालेली नाही, असे हवाई दलातील सूत्रांनी सांगितले आहे.

वैमानिकांना उड्डाणाचे आणि ग्राऊंड स्टाफला देखभालीच्या कामाचे प्रशिक्षण

या राफेल प्रकल्पाचे नेतृत्त्व ग्रुप कॅप्टन रँकच्या अधिकाऱ्याकडून केले जाते. तसेत ३६ राफेल विमानांच्या निर्मितीपासून वैमानिक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणापर्यंतची जबाबदारी या अधिकाऱ्यांकडे आहे. वैमानिकांना उड्डाणाचे आणि ग्राऊंड स्टाफला देखभालीच्या कामाचे प्रशिक्षणाचा यामध्ये समावेश असून भारतीय हवाई दलाच्या या पथकाचे कार्यालय पॅरिसमधील सेंट क्लाऊड सबर्बमध्ये आहे. या कार्यालयात फारशी रोख रक्कम नसते. त्यामुळे गोपनीय माहिती चोरण्यासाठी घुसखोरीचा प्रयत्न झाला असावा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

- Advertisement -

वाचा – राफेल कागदपत्रे गहाळ; आरटीआयद्वारे ही माहिती आली समोर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -