चालत्या ट्रेनमध्ये महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; महिलेने विरोध करताच आरोपीने दिला ट्रेनमधून धक्का

त्या महिलेला धक्का दिल्यानंतर त्या आरोपीने सुद्धा चालत्या ट्रेनमधून उडी मारली. आरोपीला जखमी अवस्थेतमध्ये हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं. हा प्रकार पोलिसांना कळताच त्यांनी कारवाई सुरू केली आहे.

हरियाणामधील फतेहाबाद-टोहानामधील अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री उशीरा रोहतक येथून आपल्या मुलासोबत टोहाना येथे जात असलेल्या एक महिलेसोबत चालत्या ट्रेनमध्ये एका पुरूषाकडून गैरवर्तवणूक करण्यात आली. मात्र, त्या महिलेने त्याला विरोध करताच त्या आरोपीने महिलेला चालत्या ट्रेनमधून खाली धक्का दिला. ट्रेनमधून जोरात पडल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा त्या महिलेचा 9 वर्षांचा मुलगा तिथेच होता. मात्र, त्या महिलेला धक्का दिल्यानंतर त्या आरोपीने सुद्धा चालत्या ट्रेनमधून उडी मारली. आरोपीला जखमी अवस्थेतमध्ये हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं. हा प्रकार पोलिसांना कळताच त्यांनी कारवाई सुरू केली आहे.

मृत महिलेचं नाव मंदीप कौर असून त्या महिलेचं वय 30 वर्ष होतं. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पुरूष नरवाना येथून ट्रेनमध्ये चढला होता आणि ट्रेनमध्ये महिलेला एकटं पाहून तिची छेड काढायला सुरूवात केली. महिलेने त्याला विरोध करतात त्या पुरूषाने तिला ट्रेनमधून खाली धक्का दिला.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी गेली होती.तिथून पुन्हा आपल्या सासरी येत असताना ट्रेनमध्ये हा प्रकार घडला. मात्र त्या महिलेने ट्रेनमध्ये बसल्यावर आपल्या पतीला स्टेशनवर तिला आणि मुलाला घेण्यासाठी येण्यास सांगितले. परंतु जेव्हा ट्रेन स्टेशनवर आल्यानंतर त्या महिलेच्या पतीला फक्त मुलगा दिसला तेव्हा रात्री ट्रेनमध्ये घडलेला सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिस पथकाने महिलेचा शोध घ्यायला सुरूवात केली. तपासादरम्यान, त्या महिलेचा मृत देह पोलिसांना सापडला.


हेही वाचा : 100 रुपयांच्या पेटीएमने पकडले 4 कोटींचे दागिने लुटणारे चोर; दिल्लीतील धक्कादायक घटना