Homeक्राइमAtul Subhash : लाखो अतुल सुभाष खोट्या केसमुळे त्रासलेले; त्यामुळे... सर्वोच्च न्यायालयात...

Atul Subhash : लाखो अतुल सुभाष खोट्या केसमुळे त्रासलेले; त्यामुळे… सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Subscribe

बंगळुरूमधील ऑटोमोबाइल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या 34 वर्षाच्या अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून सोमवारी आत्महत्या केली आहे. या बातमीमध्ये एक अपडेट समोर आली आहे. विशाल तिवारी नावाच्या एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.

मुंबई : बंगळुरूमधील ऑटोमोबाइल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या 34 वर्षाच्या अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून सोमवारी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी 81 मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून 24 पानांची सुसाइड नोट लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी आपल्या शेवटच्या 12 इच्छा व्यक्त केल्या आहेत. अतुल सुभाष यांच्यावर त्यांच्या पत्नीने नऊ गुन्हे दाखल केले होते. न्यायालयीन प्रक्रियेला कंटाळून अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. या बातमीमध्ये एक अपडेट समोर आली आहे. विशाल तिवारी नावाच्या एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, असे लाखो अतुल सुभाष आहेत जे त्रासलेले आहेत. (Atul Subhash like lakhs of cases pil in supreme court to change dowry law.)

हेही वाचा : ICC Champions Trophy 2025 : अखेर हाइब्रिड मॉडलला मान्यता; भारताचे सामने कुठे? जाणून घ्या…

तसेच ते म्हणाले, हे एका अतुल सुभाषचे प्रकरण नाही, तर अशी लाखो प्रकरणे आहेत, असे त्यांनी त्यांच्या याचिकेमध्ये नमूद केले आहे. तसेच जो कायदा एकेकाळी महिलांच्या संरक्षणासाठी होता. आता या कायद्यांचे पुनरावलोकन करण्याची वेळ आली आहे. या कायद्यांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करावी, अशी विनंती विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. तसेच कायदे योग्य आहेत का, काही उणिवा असतील तर त्या कशा दूर करता येतील, याचा विचार या समितीने करावा.

हेही वाचा : SMAT 2024 : दोन धावांनी शतक हुकले, पण रहाणेच्या तुफान फटकेबाजीमुळे मुंबई फायनलमध्ये

तसेच या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, वकील आणि इतर कायदेतज्ज्ञांचा देखील समावेश असावा, असे त्यांनी म्हटले आहे. विवाहित महिलांच्या सुरक्षेसाठी हुंडाबळीसारखे कायदे आणण्यात आले होते, मात्र आज त्याचा पुरूषांविरुद्ध शस्त्र म्हणून वापर केला जात असल्याचे याचिकेत म्हटले आहे.


Edited By Komal Pawar Govalkar