Homeक्राइमAtul Subhash Suicide Case : निकिताची आई बनली मंथरा, सुभाष आत्महत्याप्रकरणाची दुसरी...

Atul Subhash Suicide Case : निकिताची आई बनली मंथरा, सुभाष आत्महत्याप्रकरणाची दुसरी बाजू

Subscribe

2019मध्ये अतुल आणि निकिताचे लग्न वाराणसीतील एका हॉटेलमध्ये झाले होते. सुरुवातीला निकिता लग्नासाठी तयार नव्हती, पण, वडील आजारी आहेत आणि ते जिवंत असतानाच लग्न करा, असे जेव्हा घरच्यांनी समजावल्यानंतर ती लग्नाला तयार झाली. लग्न झाल्यावर तिने अतुलला याची कल्पना दिली होती.

(Atul Subhash Suicide Case) नवी दिल्ली : पत्नी निकिता आणि तिच्या कुटुंबीयांच्या कथित छळाला कंटाळून एआय अभियंता अतुल सुभाष यांनी बंगळुरूमध्ये केलेल्या आत्महत्याप्रकरणात वेगवेगळ्या बाजू समोर येत आहेत. निकिताने मनाविरुद्ध लग्न केले होते. अतुलशी लग्न करण्याचा निकिताचा अजिबात विचार नव्हता, पण वडिलांचे आजारपण आणि कौटुंबिक दबावामुळे तिने या विवाहास होकार दिला. त्यातच तिची आई निशा हिने मंथराची भूमिका बजावल्याने दोघांमधील संबंध टोकाला गेल्याचे सांगितले जाते. (Nikita’s mother increased the rift between the couple)

अतुल सुभाषची पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई निशा आणि भाऊ अनुराग हे तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरू आहे. 2019मध्ये अतुल आणि निकिताचे लग्न वाराणसीतील एका हॉटेलमध्ये झाले होते. सुरुवातीला निकिता लग्नासाठी तयार नव्हती, पण, वडील आजारी आहेत आणि ते जिवंत असतानाच लग्न करा, असे जेव्हा घरच्यांनी समजावल्यानंतर ती लग्नाला तयार झाली. लग्न झाल्यावर तिने अतुलला याची कल्पना दिली होती.

हेही वाचा – Rokhthok : भारतातील लोकशाहीला स्वकीयांकडूनच धोका, संजय राऊतांच्या निशाण्यावर भाजपा

वास्तविक, निकिताच्या वडिलांना हृदयविकार होता आणि लग्नानंतर त्यांचे निधन झाले. यानंतर निकिता अतुलबरोबरच्या वादासंदर्भात काका सुशील सिंघानिया यांचा सल्ला घेत असे. तथापि, अतुल आणि निकितामधील वितुष्ट वाढविण्यात आई निशाचा हात होता. लग्नानंतर ती निकिताशी तासनतास बोलायची आणि तिला सासरच्यांविरुद्ध भडकावून आगीत तेल ओतायची, कधी-कधी ती दिवसातून पाच-सहा वेळा फोन करायची, असेही समोर आले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये निकिताने जौनपूरच्या कौटुंबिक न्यायालयात नोंदवलेल्या जबाबातून ही माहिती मिळाल्याचे एका हिंदी वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

अतुल सुभाष या 34 वर्षीय इंजिनीअरने 10 डिसेंबर रोजी बंगळुरूमध्ये आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने सुमारे दीड तासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून 24 पानी पत्रही लिहिले आहे. त्यात त्याने पत्नी निकिता आणि तिच्या कुटुंबावर आपला छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, जास्त पोटगी मिळविण्यासाठी आपल्या चार वर्षांच्या मुलाचाही वापर केल्याचाही दावाही त्याने केला. 14 डिसेंबर 2024 रोजी निकिता हिला हरियाणातील गुरुग्राम येथून तर, आई आणि भावाला बंगळुरू पोलिसांनी घुंसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमधून अटक केली. (Atul Subhash Suicide Case: Nikita’s mother increased the rift between the couple)

हेही वाचा – Mumbai Air Pollution : हवा शुद्ध करण्यासाठी देखील आता देवावर अवलंबून रहायचे का? प्रदूषणावरून उच्च न्यायालयाने फटकारले


Edited by Manoj S. Joshi