Homeदेश-विदेशAtul Subhash : आत्महत्या करताना अतुल जे म्हणाले होते तेच घडतंय, निकिताबाबत...

Atul Subhash : आत्महत्या करताना अतुल जे म्हणाले होते तेच घडतंय, निकिताबाबत काय म्हणाले वकील?

Subscribe

माझ्या आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्या सासरच्या लोकांना शिक्षा व्हावी, अशी मागणी अतुल सुभाष यांनी आत्महत्या करताना केली होती. याचवेळी त्यांनी त्यांची बायको निकिता ही त्यांच्या मुलाचा वापर एखाद्या शस्त्रासारखा करू शकते, असेही म्हटले होते.

बंगळुरू : बंगळुरूमधील ऑटोमोबाइल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या 34 वर्षाच्या अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्याची घटना 10 डिसेंबर, 2024 ला घडली. पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून अतुल यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. परंतु, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी 81 मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून 24 पानांची सुसाइड नोट लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर काही दिवसांनी बंगळुरू पोलिसांनी अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई आणि भावाला अटक केली. सध्या या प्रकरणावर बंगळुरू न्यायालयात सुनावणी सुरू आहे. परंतु, या सुनावणीमध्ये आत्महत्या करताना अतुल सुभाष यांनी जे काही सांगितले होते, तेच घडत आहे का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. (Atul Subhash while committing suicide whatever had said about Nikita Singhania is exctly happening same)

माझ्या आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्या सासरच्या लोकांना शिक्षा व्हावी, अशी मागणी अतुल सुभाष यांनी आत्महत्या करताना केली होती. याचवेळी त्यांनी त्यांची बायको निकिता ही त्यांच्या मुलाचा वापर एखाद्या शस्त्रासारखा करू शकते, असेही म्हटले होते. त्याचप्रमाणे आता निकिता काहीसे करत असून मुलाचा सांभाळ करण्यासाठी निकिताने न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला आहे. सोमवारी (ता. 30 डिसेंबर) निकिताच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. त्यानंतर आता पुन्हा याच जामीन याचिकेवर 04 जानेवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती अतुल सुभाष यांचे वकील आकाश जिंदाल यांनी दिली आहे. या सुनावणीबाबत बोलताना वकील जिंदाल म्हणाले की, निकिता आणि तिच्या कुटुंबीयांचा जामीन अर्ज आज सूचिबद्ध करण्यात आला. न्यायालयीन प्रक्रियेतून सुटण्यासाठी मुलाचा शस्त्र म्हणून वापर करू नये, असे अतुलने त्यांच्या आत्महत्येच्या व्हिडिओमध्ये नमूद केले होते. आणि हेच होत आहे.

हेही वाचा… Sharmistha Mukherjee Vs Congress : प्रणव मुखर्जींची कन्या पुन्हा काँग्रेसवर भडकली, म्हणाली…

तर, निकिताच्या वकिलांनी न्यायालयात व्योमचा (निकिता-अतुल सुभाषचा मुलगा) सांभाळ करण्यासाठी तिला जामीन देण्यात यावा, अशी मागणी केली. परंतु, त्यांची ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. पण, जर का निकिताला जामीन दिला तर ती मुलाला घेऊन फरार होऊ शकते, त्यामुळे अशा परिस्थितीत न्यायालयाने तिला आता जामीन देऊन मुलाचा शस्त्रासारखा वापर करण्याची परवानगी तिला देऊ नये, असे म्हटले आहे. तर अशीच बाजू त्यांनी न्यायालयात सुद्धा मांडली आहे. मुलाचा वापर करून निकिता आणि तिच्या कुटुंबीयांनी न्यायालयाकडून जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ते शक्य होऊ शकले नाही.

सोमवारी झालेल्या सुनावणीनंतर अतुल सुभाष यांचे वडील पवन कुमार मोदी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, निकिता आणि तिच्या भावाला सोबतच आईला जामीन न मिळाल्याने आम्ही आनंदी आहोत. तर, माझा नातू निकितासाठी एटीएम होता. त्याच्या संगोपनाच्या नावाखाली ती पैसे घेत होती. निकिताने ज्यावेळी आमच्याकडे पोटगी म्हणून 80 हजारांची मागणी केली होती, त्याचवेळी आम्ही मुलाच्या ताब्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, असे पवन मोदी यांच्याकडून सांगण्यात आले.


Edited By Poonam Khadtale