घरताज्या घडामोडीबंगळुरूमध्ये भीषण अपघात! विजेच्या खांब्याला आदळली ऑडी, आमदाराचा मुलगा, सूनेसह ७ जणांचा...

बंगळुरूमध्ये भीषण अपघात! विजेच्या खांब्याला आदळली ऑडी, आमदाराचा मुलगा, सूनेसह ७ जणांचा मृत्यू

Subscribe

७ जणांपैकी ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

कर्नाटक (Karnataka) बंगळुरुच्या (bengluru) कोरमंगला (Koramangala) परिसरात कार विजेच्या खांब्याला आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात एक ऑडी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विजेच्या खांब्याला आदळली. कारमध्ये तमिळनाडूच्या (Tamilnadu) होसुर सीटचे डीएमके पक्षाचे आमदार वाई प्रकाश (Vai prakash) यांचा मुलगा करुणा सागर आणि सून बिंदू यांच्यासह ७ जणांचा दुर्देवी मृत्यू झालाय. आमदार वाई प्रकाश यांनी स्वत: मुलगा आणि सुनेचे अपघातात निधन झाल्याचे माध्यमांना सांगितले.


हा भीषण अपघात बेंगळुरुच्या मंगा कल्याणनमटप्प परिसरात झाला. ७ जणांपैकी ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला रुग्णालयात घेऊन जात असताना अँम्ब्युलन्समध्ये त्याने जीव सोडला. अपघात झालेली ऑडी Q3 कार आमदार वाई प्रकाश यांच्या नावावर होती. या भीषण अपघाताचे काही फोटो समोर येत आहेत. या फोटोंमधून अपघाताची भीषणता दिसत आहे. कार विजेच्या खांब्याला इतक्या जोरात आदळली की संपूर्णपणे कारला तडे गेलेत. कारचे बोनेट, आतील बाजू अत्यंत वाईट अवस्थेत पहायला मिळत आहे.

- Advertisement -

अपघात इतका भयानक होता की एखादा धमाका झाल्यावर जसा आवाज येतो तसा आवाज आल्याचे प्रत्यक्षर्शींने सांगितले. अपघात होताच स्थानिक नागरिक मदतीसाठी घटनास्थळी पोहचले. कारमधून लोकांना बाहेर काढणे अत्यंत कठीण होते कारण कार पूर्णपणे चेपून गेली होती. काही वेळाच पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारमध्ये मृतदेह एकमेकांत अडकले होते. मृतदेह बाहेर काढण्यासाठी कारचे काही भाग गॅस कटरच्या मदतीने कापावे लागले. या भीषण अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा – तालिबान्यांकडून हल्ल्यांसाठी केरळवासियांचा वापर, भारताची प्रतिमा मलीन करण्याचा डाव

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -