घरदेश-विदेशAgusta Westland Deal : मिशेलची सेटिंग ऐकून तुम्हाला धक्का बसेल

Agusta Westland Deal : मिशेलची सेटिंग ऐकून तुम्हाला धक्का बसेल

Subscribe

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये दलाल ख्रिश्चिअन मिशेलला भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर आता नवीन खुलासे समोर येत आहेत.

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये दलाल क्रिश्चियन मिशेलला भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर आता नवीन खुलासे समोर येत आहेत. ऑगस्टा वेस्टलँड या व्हिव्हिआयपी हेलिकॉप्टरच्या खरेदी प्रकरणामध्ये क्रिश्चियन मिशेलचे पत्र हाती लागले आहे. यातील मजकूर ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. क्रिश्चियन मिशेलची पोहोच थेट तत्कालीन युपीए सरकारच्या काळातील काही मंत्र्यांपर्यंत होती. त्यामुळे त्याला संवेदनशील बैठकांची प्रत्येक माहिती देखील मिळत होती. शिवाय, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मोठा गट देखील क्रिश्चियन मिशेलला प्रत्येक माहिती पुरवत होता. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेसाठीच्या कॅबिनेट कमिटीच्या बैठकींची माहिती देखील मिशेलला मिळत होती. एका वृत्तपत्रानं याबाबतची माहिती दिली आहे.

पत्रातील मजकूर काय आहे?

क्रिश्चियन मिशेलने ऑगस्ट वेस्टलँडचे मालक जी. ओरसी यांना एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यानं अमेरिकेचे तत्कालीन सेक्रेटरीज ऑफ स्टेट हिलरी क्लिंटन आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामध्ये झालेल्या गोपनीय चर्चेचा तपशील मिळत होता असा दावा केला होता. या पत्रामध्ये क्रिश्चियन मिशेलने २००९ साली १९ ते २३ जुलैदरम्यान हिलरी क्लिंटन आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामध्ये झालेल्या बैठकींचा उल्लेख देखील केला आहे.

- Advertisement -

वाचा – ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : क्रिश्चियन मिशेलचे दुबईतून प्रत्यार्पण

काय आहे ऑगस्टा वेस्टलँड खरेदी प्रकरण

देशातील अतिमहत्वाच्या व्यक्तिंसाठी ३ हजार ६०० कोटी रूपये खर्च करून १२ हेलिकॉप्टर्सची खरेदी केली जाणार होती. इटलीच्या सरकारी मालकीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून एडब्ल्यू १०१ जातीची १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार २०१० साली करण्यात आला होता. यामधील ८ हेलिकॉप्टर्स राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी वापरली जाणार होती. तर उर्वरित ४ इतर कारणांसाठी वापरली जाणार होती. पण, देशातील विविध लोकांना ३६० कोटी लाच दिल्याचा आरोप झाला. त्यानंतर हा व्यवहार १ जानेवारी २०१४ रोजी रद्द करण्यात आला.  या प्रकरणी माजी हवाई दलप्रमुख एस.पी. त्यागी यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हाही दाखल केला होता. यामध्ये सोनिया गांधींसह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, तत्कालीन परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी, तत्कालीन प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायण, काँग्रेस नेते अहमद पटेल आणि वीरप्पा मोईली यांची देखील नावं आली होती.

वाचा – ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण ; मध्यस्ती ख्रिस्तीयन मिशेलला CBI कोठडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -