घरदेश-विदेशहृदय पिळवटून टाकणारी घटना: UPतील रुग्णालयानं दिली नाही रुग्णवाहिका; भावाने पाठीला बांधून...

हृदय पिळवटून टाकणारी घटना: UPतील रुग्णालयानं दिली नाही रुग्णवाहिका; भावाने पाठीला बांधून नेला बहिणीचा मृतदेह

Subscribe

औरैया जिल्ह्यात आरोग्य सेवेची स्थिती किती बिकट आहे, याचे उदाहरण येथील CHCमध्ये (Community Health Center) पाहायला मिळाले. एका मुलीचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णालयाकडून वाहन देण्यात आलं नाही. शेवटी मृत मुलीच्या भावाने बहिणीचा मृतदेह बाईकवरून नेला.

लखनौ: औरैया जिल्ह्यात आरोग्य सेवेची स्थिती किती बिकट आहे, याचे उदाहरण येथील CHCमध्ये (Community Health Center) पाहायला मिळाले. एका मुलीचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णालयाकडून वाहन देण्यात आलं नाही. शेवटी मृत मुलीच्या भावाने बहिणीचा मृतदेह बाईकवरून नेला. या धक्कादायक घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Auraiya district Uttar Pradesh CHC Community Health Center did not provide vehicle The brother took the body of the sister on the bike)

नवीन बस्ती पश्चिम येथे राहणारे प्रबल प्रताप सिंग यांची मुलगी अंजली (20) पाणी गरम करण्यासाठी गेली होती, परंतु तिथे बादलीत असलेल्या इलेक्ट्रॉनिक रॉडला तिचा स्पर्श झाला आणि शॉक लागल्याने बेशुद्ध झाली. तिच्या कुटुंबीयांच्या हे लक्षात येताच तिला बेशुद्ध अवस्थेत सीएचसीमध्ये (Community Health Center ) नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. यानंतर जे घडले ते सीएचसी आवारात उपस्थित असलेले लोक पाहत राहिले. या मुलीचा मृतदेह नेण्यासाठी कोणतेही साधन यावेळी उपलब्ध झालं नाही आणि त्यामुळे तिच्या भावाने तिचा मृतदेह आपल्या पाठीला बांधला आणि दुचाकीवरून घेऊन गेला.

- Advertisement -

दरम्यान, भावाने मृत बहिणीचा मृतदेह पाठीला स्कार्फ बांधून घरी आणला. या संपूर्ण घटनेकडे जवळपास 15 मिनिटे सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी बाबूराम मोहनलाल कॉलेजजवळील नवीन बस्ती पश्चिम येथे राहणारी अंजली आंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी खोलीत गेली. जिथे बादलीत इलेक्ट्रॉनिक रॉड ठेवला होता. यादरम्यान तिला विजेचा धक्का बसला. अंजली बादलीजवळ पडलेली पाहून कुटुंबीयांनी तिला सीएचसीमध्ये नेले. तेथे उपस्थित डॉक्टरांनी अंजलीला मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीय रडले. पोस्टमार्टम करायचं नाही असं म्हणत कुटुंबिय मृतदेह घरी घेऊन गेले.

- Advertisement -

अंजलीचा भाऊ आयुष, वडील प्रबल आणि इतर बहीण दुचाकीवर होते. अंजलीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांना इतका धक्का बसला की कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलवायला हवी याकडे लक्षही दिले नाही. अंजलीच्या वडिलांनी तिचा मृतदेह मध्यभागी ठेवला. तोल बिघडू नये म्हणून भाऊ आयुषने अंजलीचा मृतदेह पाठीवर स्कार्फने बांधला. हा सर्व प्रकार सीएचसीच्या आवारात सुमारे 15 ते 20 मिनिटे सुरू होता. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या.

याबाबत सीएचसी अधीक्षक म्हणाले की, मृतदेह नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स मागितली असती तर ती नक्कीच दिली असती. तसंच, जर अॅम्ब्युलन्स उपलब्ध नसेल तर दुसऱ्या रुग्णालयातून वाहन आणून मृतदेह घरी पाठविला जातो. परंतु आम्हाला मृतदेह दुचाकीवरून नेल्याची माहिती नाही. असे काही घडलं असल्यास माहिती घेतली जाईल.

मृतदेह रुग्णालयातून घरी नेण्यासाठी वाहने देण्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न आहे. सध्या जिल्ह्यात केवळ दोनच रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी एक वैद्यकीय महाविद्यालयात असते, तर दुसरी मोठ्या रुग्णालयात ठेवली जाते. या रुग्णवाहिका मागवल्या असता त्या यायला अडीच तास लागतात.

(हेही वाचा: Bihar CM माफीनामा : ‘मी स्वतःचा निषेध करतो, मला खेद वाटतो’; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यासाठी नितीशकुमारांनी मागितली माफी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -