घरदेश-विदेश'या' जेलीफिशने घेतला ३ हजार लोकांना चावा

‘या’ जेलीफिशने घेतला ३ हजार लोकांना चावा

Subscribe

ऑस्ट्रेलियात एका छोट्या आकाराच्या जेलीफिशने धुमाकूळ घालता आहे. समुद्र किणाऱ्यात जाणाऱ्या ३ हजार ६०० नागरिकांना तिने चावा घेतला आहे. यामुळे अनेकजण जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले.

ऑस्ट्रेलियातील समुद्र किणाऱ्यावर सध्या एका छोट्या प्राण्याने मोठी धुमाकूळ घातली आहे. या जेलीफिशने आतापर्यंत ३ हजार ६०० नागरिकांचा चावा घेतला आहे. या घटनेत अनेक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत दरम्यान या घटनेनंतर येथील समुद्र किणारे बंद ठेवण्यात आले आहेत. ब्लूबॉटले जेलीफिश असे या प्रजातीचे नाव असून. निळ्या रंगाच्या या जेलीफिश आकाराने लहान आहेत. मात्र चावल्यावर दुखापत सुरु होते. यानंतर अनेकांना चक्कर आणि उलट्या सुरु होतात. मागील आठवड्यात १३ हजार जेलीफिश किणारपट्टीवर आढळल्या आहेत.

म्हणून जेलीफीश येतात किणाऱ्यावर

जेलीफिश प्रजननासाठी किणारपट्टीवर येतात. समुद्रात असलेल्या जेलीफिश या प्रजननासाठी बाहेर येत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. अशात येणाऱ्या नागरिकांमुळे होणाऱ्या अडचणीमुळे या जेलीफिश चावा घेतात. जेलीफिश चावल्यामुळे अजून कोणाचा मृत्यू झाला नाही मात्र काळजी म्हणून नागरिकांना किणारपट्टीवरून दूर ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -