घरदेश-विदेशखालिस्तान्यांविरोधात ऑस्ट्रेलियाची झीरो टाॅलरन्स नीती; भारताला आश्वासन

खालिस्तान्यांविरोधात ऑस्ट्रेलियाची झीरो टाॅलरन्स नीती; भारताला आश्वासन

Subscribe

ऑस्ट्रेलियाचे सामाजिक आणि सामुदायिक गृहनिर्माण मंत्री मायकल सुकर यांनी शुक्रवारी सांगितले की ऑस्ट्रेलियात होणारा हिंसाचार आणि हिंदू मंदिरांची तोडफोड आणि काही खलिस्तानींच्या कारवायांबाबत शून्य-सहिष्णुता धोरण आम्ही अवलंबलं आहे. अशा घटना देशात खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे ऑस्ट्रेलियाचे मंत्री म्हणाले.

ऑस्ट्रेलियाचे सामाजिक आणि सामुदायिक गृहनिर्माण मंत्री मायकल सुकर यांनी शुक्रवारी सांगितले की ऑस्ट्रेलियात होणारा हिंसाचार आणि हिंदू मंदिरांची तोडफोड आणि काही खलिस्तानींच्या कारवायांबाबत शून्य-सहिष्णुता धोरण आम्ही अवलंबलं आहे. अशा घटना देशात खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे ऑस्ट्रेलियाचे मंत्री म्हणाले. ( Australias zero tolerance policy against Khalistan Assurance to India by Australian minister Michael Sukkar  )

ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांच्या तोडफोडीबद्दल एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मंत्री सुकर म्हणाले की, मी भारतातील अनेक लोकांची चिंता पूर्णपणे समजू शकतो. ऑस्ट्रेलियात घडणाऱ्या हिंसाचारांच्या घटना, हिंदू मंदिरांवर हल्ले यासारख्या मुद्द्यांवर शून्य सहनशीलता धोरण ऑस्ट्रेलियाने अवलंबले आहे. मायकल सुकर म्हणाले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत अशा हिंसक कारवाया अजिबात खपवून घेणार नाही. आम्ही अशा प्रकारच्या हिंसक कृत्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

- Advertisement -

यावेळी मंत्री सुकर म्हणाले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध खूप महत्त्वाचे आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय प्रवासी समुदाय आहे. आॅस्ट्रेलिया आणि भारत यांना मुक्त व्यापार कराराच्या रूपात आर्थिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. चतुर्भुज शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल बोलताना मंत्री सुकर म्हणाले की, भारताचे पंतप्रधान क्वाड समिटसाठी ऑस्ट्रेलियाला भेट देण्याचे ठरवत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. आमच्या देशासाठी ही बाब खूप महत्त्वाची आहे, असे आम्हाला वाटते. आशिया पॅसिफिक प्रदेश हा जगातील समृद्धी आणि शांततेच्या भवितव्यासाठी महत्त्वाचा आहे.

( हेही वाचा: अयोध्येत ट्रक आणि बसमध्ये जोरदार धडक; अपघातात ७ जणांचा मृत्यू )

- Advertisement -

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, देश, धार्मिक स्थळांवर होणारी कोणतीही टोकाची कारवाई किंवा हल्ला खपवून घेणार नाही आणि हिंदू मंदिरांवर अशा कारवाईला जागा नाही. अल्बानीज म्हणाले की, ऑस्ट्रेलिया हा लोकांच्या विश्वासाचा आदर करणारा देश आहे. आम्ही कोणत्याही प्रकारची टोकाची कृती आणि हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. जे आपण धार्मिक इमारतींवर होणारे हल्ले पाहिले आहेत. मग ते हल्ले हिंदू मंदिरे, मशिदी किंवा चर्चवर झाले असतील, ऑस्ट्रेलियात धर्मांधतेला स्थान नाही, असं पंतप्रधान अ‌ॅंथनी म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -