Lockdown: पुन्हा लॉकडाऊन! नवीन कोरोनाच्या लाटेमुळे देशाचा निर्णय

Austria begins national lockdown to fight surge in Covid-19 cases
Lockdown: पुन्हा लॉकडाऊन! नवीन कोरोनाच्या लाटेमुळे देशाचा निर्णय

अजूनही काही देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही आहे. कोरोनाच्या नव्या लाटा डोके दुःखी वाढवत आहेत. आता ऑस्ट्रियात कोरोनाच्या नव्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्णपणे पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. पुन्हा लॉकडाऊन करणारा ऑस्ट्रिया देश पश्चिम युरोपातील पहिला देश ठरला आहे. त्यामुळे आता सरकार फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहे.

ऑस्ट्रियात जवळपास दोन तृतीयांश लोकसंख्येला कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे. पश्चिम युरोपातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी दरांपैकी ऑस्ट्रिया एक आहे. दरम्यान माहितीनुसार ऑस्ट्रियामध्ये कोरोनाची चौथी लाट आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑस्ट्रियाचे चांसलर अलेक्झांडर शालेनबर्ग यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. आजपासून या लॉकडाऊन सुरुवात झाली असून १० दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे.

यादरम्यान विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्षपणे जाण्यास बंदी घातली आहे. तसेच रेस्टॉरंट आणि सांस्कृतिक कार्यक्रमावरही बंदी घालण्यात आली आहे. जर लॉकडाऊन लागू करूनही कोरोनाच्या संक्रमण कमी झाले नाही तर पुन्हा २० दिवसांचा लॉकडाऊन वाढवला जाणार आहे.

ऑस्ट्रियामधील लोकं कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास पाठ फिरवत आहेत. याबाबत चांसलर अलेक्झांडर शालेनबर्ग एका पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘आम्ही सर्व लोकांना लस घेण्यासाठी आवाहन करण्यात अपयशी ठरलो आहे. पण १ फेब्रुवारीपर्यंत सर्वांचे लसीकरण पूर्ण होईल.’


हेही वाचा – corona infection : कोरोनामुळे गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे आरोग्य धोक्यात, संशोधनातून खुलासा