घरट्रेंडिंगसाचलेल्या पाण्यात रिक्षा चालकाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ बघताच हसून व्हाल थक्क

साचलेल्या पाण्यात रिक्षा चालकाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ बघताच हसून व्हाल थक्क

Subscribe

मुसळधार पाऊस झाल्यास सखल भागांत पाणी साचते. रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना आणि वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना तासंतास वाहतूक कोंडीचा सामाना करावा लागतो.

मुसळधार पाऊस झाल्यास सखल भागांत पाणी साचते. रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना आणि वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना तासंतास वाहतूक कोंडीचा सामाना करावा लागतो. तसेच, पाणी साचल्याने रस्ते अदृष्य होत असल्याने चाकरमान्यांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

पावसाळ्यात अशी परिस्थिती नेहमीच निर्माण होते. त्यामुळे राज्यातील पायभूत सुविधा आणि सरकारवर टीका करत नाराजी व्यक्त करतात. पण काही जण या साचलेल्या पाण्याचा आनंद घेताना अनेकदा आपण पाहिले आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Auto driver dance in road during water logging in rain)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक रिक्षा साचलेल्या पाण्यामध्ये बंद पडते. त्यानंतर त्या रिक्षाचा चालक रिक्षातून बाहेर येऊन साचलेल्या पाण्यात नाचतो. अगदी मनमोकळे पणाने आणि बिनधास्त हा चालक नाचनाता पाहायला मिळतेय. “तेरी पायल बजी जहां मैं पागल हुआ या” या प्रसिद्ध हिंदी गाण्यावर तो रिक्षा चालक नाचत आहे.

बॉलिवूड अभिनेते आणि स्टँड-अप कॉमेडियन सुनील ग्रोव्हरने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 107,689 इतक्या चाहत्यांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. तसेच, या व्हिडीओवर अनेकांनी हास्यस्पद कमेंट्स दिल्या आहेत.

- Advertisement -

सध्यस्थितीत या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या रिक्षा व्यक्तीची ओळख पटलेली नाही. शिवाय, हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणी शूट केला आहे, कोणी काढला आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे.


हेही वाचा – ‘हर घर तिरंगा चळवळ’ मजबूत करण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन; जाणून घ्या 22 जुलैचीच निवड का?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -